Case Against Samantha | प्रदर्शनाआधीच ‘पुष्पा’ वादात, समंथाविरोधात गुन्हा दाखल! नेमकं प्रकरण काय?

Case Against Samantha | प्रदर्शनाआधीच ‘पुष्पा’ वादात, समंथाविरोधात गुन्हा दाखल! नेमकं प्रकरण काय?
Samantha Ruth Prabhu

आगामी ‘पुष्पा’ या चित्रपटातील 'ओ अंतया ओ...' या गाण्यातील समंथाच्या डान्स परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क केले. पण एका संस्थेला समंथाचे हे गाणे अजिबात आवडले नाहीय, त्यामुळे त्यांनी अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 14, 2021 | 9:44 AM

मुंबई : दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Case Against Samantha) काही काळापूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. पती नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर समंथाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि आता ती हळूहळू आपल्या आयुष्यात पुढे जात आहे. पण, अजूनही समंथाचा त्रास काही संपताना दिसत नाहीये. आता समंथाच्या व्यावसायिक आयुष्यातही समस्या येऊ लागल्या आहेत. नुकत्याच, एका नवीन गाण्यामुळे समंथा रुथ प्रभू विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

आगामी ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘ओ अंतया ओ…’ या गाण्यातील समंथाच्या डान्स परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क केले. पण एका संस्थेला समंथाचे हे गाणे अजिबात आवडले नाहीय, त्यामुळे त्यांनी अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

खरंतर, काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांचा ‘पुष्पा द राईज’ चित्रपटातील ‘ओ अंतया ओ…’ हा आयटम नंबर रिलीज झाला होता, ज्यामध्ये समंथाचा लूक आणि तिचा डान्स सर्वांनाच आवडला होता. मात्र, एका पुरुष संघटनेने या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. या संघटनेच्या म्हणण्यानुसार, या गाण्याचे बोल पुरुषांच्या विरोधात असून, हे गाणे पुरुषांबद्दलची घाणेरडी विचारसरणी व्यक्त करते. या गाण्यातून असे दिसते की, पुरुष नेहमीच सेक्सचा विचार करत असतात. याच कारणामुळे हे गाणे चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी संघटनेने केली आहे.

चंदन तस्कराविरोधातील लढा

‘पुष्पा द राईज’ या चित्रपटात चंदन तस्करीची कथा दाखवण्यात येणार आहे, ज्याच्या विरोधात अल्लू अर्जुन लढताना दिसणार आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन स्थानिक रहिवासी पुष्पा राजची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अर्जुन एका ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसणार आहे, जो लाल चंदनाची तस्करी करतो. या चित्रपटात अर्जुन व्यतिरिक्त फहाद फासिल, रश्मिका मंदान्ना आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. पुष्पाची व्यक्तिरेखा अत्यंत निर्भय आहे, त्यामुळे तो प्रत्येक समस्येला अतिशय चपखलपणे हाताळतो. त्याचवेळी, चित्रपटातील रश्मिका मंदनाची व्यक्तिरेखा एका स्थानिक मुलीची आहे, जिच्यावर पुष्पा खूप प्रेम करतो.

पहिल्यांदाच दिसणार अल्लू-रश्मिकाची जोडी

‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट तेलगू, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. समंथाचा डान्स नंबर याच चित्रपटात आहे, ज्याबद्दल निर्माते खूप उत्सुक होते. पण आता चित्रपटाचे लोकप्रिय गाणे वादात अडकल्याने, चित्रपट देखील आता वादात सापडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

Vicky-Ankita Wedding | ‘आज मेरे यार की शादी है..’ अंकिता लोखंडे-विकी जैनच्या संगीत सोहळ्याला कंगनाने लावले चार चांद!

Happy Birthday Rana Daggubati | फोटोग्राफीचे व्यवसायिक शिक्षण, अभिनयच नव्हे ‘या’ क्षेत्रातही राणा दग्गुबाती अव्वल!

Happy Birthday Sameera Reddy | आई झाल्यानंतर नैराश्यात गेली, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहतेय समीरा रेड्डी!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें