AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Sameera Reddy | आई झाल्यानंतर नैराश्यात गेली, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहतेय समीरा रेड्डी!

सलमान खानचा भाऊ सोहेल खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy ) गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर आहे. समीराचा जन्म 14 डिसेंबर 1978 रोजी झाला. यंदा समीरा तिचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Sameera Reddy | आई झाल्यानंतर नैराश्यात गेली, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहतेय समीरा रेड्डी!
Sameera Reddy
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : सलमान खानचा भाऊ सोहेल खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy ) गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर आहे. समीराचा जन्म 14 डिसेंबर 1978 रोजी झाला. यंदा समीरा तिचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. समीरा जेव्हा चित्रपटात आली तेव्हा सर्वांनी तिचा अभिनय आणि अदा पाहिल्या आणि ती खूप पुढे जाईल, असे म्हटले.

तिने आपल्या पहिल्याच म्युझिक व्हिडीओने लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. पण तिची कारकीर्द म्हणावी तितकी चांगली झाली नाही. समीराच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत…

म्युझिक व्हिडीओद्वारे पदार्पण!

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी हिने 1997मध्ये गझल गायक पंकज उधास यांच्या ‘और आहिस्ता करिये बातें’ या म्युझिक व्हिडीओद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ज्यामध्ये तिच्या निरागस अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 2002 मध्ये ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

समीरा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली. यामध्ये ‘डरना मना है’, ‘मुसाफिर, ‘नो एंट्री’, ‘प्लॅन’, ‘टॅक्सी नंबर 92 11’ आणि ‘दे दना दन’ यांचा समावेश आहे. 2012 मध्ये रिलीज झालेल्या प्रकाश झा यांच्या ‘चक्रव्यूह’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.

मराठी उद्योगपतीसोबत बांधली लग्नगाठ!

2014 मध्ये समीरा रेड्डी हिने अक्षय वर्दे या उद्योगपतीसोबत अगदी खाजगी पद्धतीने सात फेरे घेतले. लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली. अक्षय हा ‘Vardenchi Motorcycles’  या कंपनीचा सहमालक आहे. ही कंपनी मोटार बाईक कस्टमाईज करते. समीरा आणि अक्षयची भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. अक्षयने समीराला बाईक चालवताना पाहिले, तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता.

आई झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली अभिनेत्री!

समीरा आणि अक्षय दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मराठी रितीरिवाजानुसार हे लग्न पार पडले. 2015 मध्ये समीराने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर ती डिप्रेशनमध्ये गेल्याचे समीराने सांगितले होते. गरोदरपणानंतर समीराला प्लेसेंटा प्रिव्हिया झाला होता, त्यामुळे ती सुमारे 4 ते 5 महिने बेड रेस्टवर होती. तिचे वजन वाढले होते, त्यामुळे तिला मानसिक त्रास होऊ लागला.

जुलै 2019 मध्ये समीरा रेड्डीने एका मुलीलाही जन्म दिला होता. सोशल मीडियावर समीरा अनेकदा आई होण्याचा अनुभव शेअर करते. चित्रपटांपासून दूर असलेली समीरा सध्या आपल्या मुलांच्या संगोपनात व्यस्त आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.

हेही वाचा :

Mouni Roy | निळ्याशार समुद्र किनारी मौनी रॉयचा जलवा, बिकिनी लूकने चाहत्यांना केलेय घायाळ!

Video | असं काय झालं की, सारा अली खानला जान्हवी कपूरसोबत टॅक्सीत बसून घरी जावे लागले?

Miss Universe 2021 | कमी वजनाचा देखील ‘भार’ झाला! ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज संधूलाही करावा लागला ‘बॉडी शेमिंग’चा सामना!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.