Sunny Deol | चुप चित्रपटाने ‘ओपनिंग डे’ला केली इतक्या कोटींची कमाई

चुप चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. मुळात ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता बघायला मिळत होती.

Sunny Deol | चुप चित्रपटाने 'ओपनिंग डे'ला केली इतक्या कोटींची कमाई
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 12:59 PM

मुंबई : सनी देओलचा (Sunny Deol) बहुचर्चित चित्रपट चुप नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलांय. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी चित्रपटाचे बाॅक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीये. राष्ट्रीय चित्रपट दिनामुळे या चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे बोलले जात आहे. चुप चित्रपट 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या (Audience) भेटीला आला होता. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे तिकिट फक्त 75 रूपयांना होते. याचाच फायदा चित्रपटाला झाल्याचे सांगण्यात येतंय. चुप (Chup) चित्रपटात सनी देओलसोबत दुलकर सलमान देखील महत्वाच्या भूमिकेत आहे.

राष्ट्रीय चित्रपट दिनाचा फायदा सनी देओलच्या चुप चित्रपटाला

चुप चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. मुळात ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता बघायला मिळत होती. त्यामध्येही राष्ट्रीय चित्रपट दिनामुळे फक्त 75 रूपयांना चित्रपटाचे तिकिट असल्याने हा चित्रपट बघण्यासाठी अनेकजण उत्सुक होते आणि याचाच फायदा चित्रपटाला ओपनिंग डेला झाला आहे. या चित्रपटामध्ये सनी देओल एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

पहिल्या दिवशी चुप चित्रपटाचे कलेक्शन तब्बल इतके कोटी रूपये

चुप चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.60 कोटी ते 3.20 कोटींचे कलेक्शन बाॅक्स ऑफिसवर केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. यामधील एक विशेष बाब म्हणजे पहिल्या दिवशी चित्रपटाची तब्बल 4 लाख तिकिटे विकली केली आहेत. मोठे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर सध्या काही खास कमाल करू शकत नसतानाच सनी देओलच्या चित्रपटाने चांगले ओपनिंग केल्याचे सांगितले जात आहे.

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.