AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द कपिल शर्मा शो’ची ‘ही’ प्रसिद्ध जोडी अडकली विवाह बंधनात, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव!

कॉमेडियन सुगंधा मिश्रा (sugandha Mishra) आणि डॉ. संकेत भोसले (Sanket Bhosale) यांनी सोमवारी (27 एप्रिल) जालंधरमध्ये लग्न गाठ बांधली आहे. या जोडप्याच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

‘द कपिल शर्मा शो’ची ‘ही’ प्रसिद्ध जोडी अडकली विवाह बंधनात, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव!
सुगंधा आणि संकेत
| Updated on: Apr 27, 2021 | 1:50 PM
Share

मुंबई : कॉमेडियन सुगंधा मिश्रा (sugandha Mishra) आणि डॉ. संकेत भोसले (Sanket Bhosale) यांनी सोमवारी (27 एप्रिल) जालंधरमध्ये लग्न गाठ बांधली आहे. या जोडप्याच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. वधू-वराच्या वेशात सुगंधाला पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नव्याने लग्न झालेल्या जोडप्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. हा फोटो त्यांच्या एका मैत्रिणीने प्रीती सिमोने शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघे एकत्र बसलेले दिसत आहेत (Comedian Sanket Bhosale and sugandha Mishra ties knot see first photo).

प्रीतीने इंस्टाग्राम स्टोरीवर सुगंधा आणि संकेत यांचे फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सुगंधाने यलो ब्लाऊज आणि पिवळ्या रंगाचा लेहेंग्यासह गळ्यात सुंदर हार घातला आहे. त्याच वेळी, पांढऱ्या रंगाच्या पोशाखावर संकेतने पिवळ्या रंगाचे जाकीट परिधान केले आहे. हसताना दोघेही खूप क्युट दिसत आहेत. फोटो शेअर करताना प्रीतीने लिहिले- आभिनंदन सुगंधा आणि संकेत. या सह जस्ट मॅरीडचा स्टिकर पोस्ट केला आहे.

मेहंदीचे फोटो केले शेअर

सुगंधाने नुकतीच तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केला आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यासह, संकेतने एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती संकेतला व्हिडीओ कॉलद्वारे आपली मेहंदी दाखवत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना संकेतने लिहिले- मेहंदी लगा कर रखना, सुगंधा मिश्रा. मेहंदी फंक्शनमध्ये सुगंधाने हिरवा आणि सोनेरी रंगाचा लेहंगा घातला होता.

पंजाबमध्ये झाले लग्न

सुगंधा आणि संकेतचे लग्न जालंधरमध्ये झाले आहे. केवळ जवळचे लोक या लग्नात सामील झाले होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करून सर्व व्यवस्था केली गेली होती. वृत्तानुसार, सर्व पाहुणे लग्नाच्या ठिकाणी येण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी केली गेली होती (Comedian Sanket Bhosale and sugandha Mishra ties knot see first photo).

लेहेंग्याबद्दल खूप उत्साही होती सुगंधा

सुगंधाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती नेहमीच आपल्या लग्नाच्या लेहंग्याबद्दल खूप उत्साही होती. लग्नात तिला लाल रंगाचा लेहंगा घालायचा होता, पण जर आता लाल रंग आउट ऑफ फॅशन झाला असेल तर ती पेस्टल कलरचा लेहेंगा परिधान करेल. म्हणूनच तिने लग्नासाठी तिने ऑफ व्हाईट कलरचा लेहेंगा निवडला. लग्नात दोघांनीही समान रंगाचा पोशाख घालण्याचा निर्णय घेतला होता.

सुगंधा मिश्रा ही विनोदी कलाकार असण्याबरोबरच एक उत्तम गायिकाही आहे. तिने कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर या दोघांसोबत काम केले आहे. दुसरीकडे, संकेत भोसलेबद्दल जर आपण बोललो तर तो संजय दत्तची भूमिका उत्तम साकारतो. सुगंधा आणि संकेत यांनीही बर्‍याच वेळा एकत्र काम केले आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये देखील ही जोडी एकत्र झळकली होती.

(Comedian Sanket Bhosale and sugandha Mishra ties knot see first photo)

हेही वाचा :

Radhe VS SMJ 2 | सलमान खान आणि जॉन अब्राहमची ‘बॉक्स ऑफिस’ टक्कर टळली, ‘सत्यमेव जयते 2’चे प्रदर्शन लांबणीवर!

छेडछाड करताच ‘दंगल गर्ल’ने लगावली कानशिलात, मुक्का पडताच वडील आले मदतीला धावून…

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.