विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये घमासान सुरू

विवेक अग्निहोत्री हे कायमच बाॅलिवूडच्या काही कलाकारांवर आणि चित्रपटांवर टीका करतात.

विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये घमासान सुरू
| Updated on: Dec 14, 2022 | 9:52 PM

मुंबई : विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. विषय कोणताही असो ते आपले मत ठामपणे मांडतात. मग अनेकदा विवेक अग्निहोत्री यांना टिकेचा सामना देखील करावा लागतो. विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाइल्स या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केला होता. या चित्रपटाला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. विवेक अग्निहोत्री हे कायमच बाॅलिवूडच्या काही कलाकारांवर आणि चित्रपटांवर टीका करतात. आता विवेक अग्निहोत्री यांच्या निशाण्यावर चित्रपट निर्माता अनुराग कश्यप आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी अनुराग कश्यपचा समाचार घेतला होता. त्यांनी ट्विटमध्ये अनुराग कश्यप यांच्या बातमीच्या हेडलाईनचा स्क्रीनशॉट शेअर केला होता.

या हेडलाईनमध्ये अनुराग कश्यपने म्हटले होते की, कांतारा आणि पुष्पा सारख्या चित्रपटांमुळे इंडस्ट्री बर्बाद होत आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, मी बाॅलिवूडच्या या मीलॉर्डच्या विधानाशी पूर्णपणे असहमत आहे.

तुम्ही सहमत आहात? विवेक अग्निहोत्री यांचे हेच ट्विट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत होते. इतकेच नाहीतर अनेक युजर्स हे अनुराग कश्यप यांचे हे विधान पूर्णपणे चुकीचे असल्याचे देखील म्हणत होते.

आता विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्विटचा दणदणीत रिप्लाय हा अनुराग कश्यपने दिला आहे. अनुराग कश्यपने लिहिले की, सर मुळात तुमची काहीच चुक नाहीये…तुमच्या चित्रपटांचे संशोधनही असेच होते, जसे माझ्या बोलण्यावर तुमचे ट्विट…

आता अनुराग कश्यप यांचे हेच ट्विट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. आता यावर विवेक अग्निहोत्री काय रिप्लाय करतात हे बघावे लागणार आहे.