दीपिका पादुकोणचं नाव अमेरिकेच्या रस्त्यावर! देखभाल करण्यासाठी मोजणार लाखो रुपये, आकडा वाचून बसेल धक्का
दीपिका पादुकोणला हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर तिचे नाव कोरले गेले आहे, हा एक मोठा सन्मान आहे. परंतु, या स्टारची देखभाल करण्यासाठी तिला दरवर्षी सुमारे ७३ लाख रुपये खर्च करावे लागतील.

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणला ओळखले जाते. तिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले. दीपिका पादुकोणने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली आहे. तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. दीपिका पादुकोणने हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर (Hollywood Walk of Fame) या सन्मानावर नाव कोरले आहे. हा कोणत्याही कलाकारासाठी एक खूप मोठा सन्मान मानला जातो. मात्र, ही प्रतिष्ठित जागा टिकवून ठेवण्यासाठी दीपिकाला काही रक्कम द्यावी लागणार आहे.
दीपिका पादुकोणने बॉलिवूडमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केल्यानंतर तिने हॉलिवूडकडे स्वत:चा मोर्चा वळवला. हॉलिवूडमध्येही तिने उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘xXx: Return of Xander Cage’ सारख्या या हॉलिवूड चित्रपटात तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. तसेच मेट गाला (Met Gala) सारख्या जागतिक कार्यक्रमांमध्येही ती उपस्थित असते. यामुळे ती जगभरात एक ग्लोबल स्टार बनली आहे. याच कारणामुळे तिला हॉलिवूडचा वॉक ऑफ फेम हा सन्मान देण्यात आला आहे.
वॉक ऑफ द फेम म्हणजे काय?
हॉलिवूड वॉक ऑफ फेम ही एक अशी जागा आहे. जिथे जगभरातील प्रसिद्ध कलाकारांची नावे स्टारच्या आकारात रस्त्यावर कोरली जातात. हे ठिकाण अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हॉलिवूड बुलेवर्ड आणि वाईन स्ट्रीटवर आहे. ही जागा मिळवण्यासाठी केवळ नाव आणि प्रसिद्ध असणं इतकंच गरजेचे नसतं. तर त्यासोबतच यासाठी वार्षिक खर्च देखील द्यावा लागतो.
दीपिकाची एकूण संपत्ती किती?
एका रिपोर्ट्सनुसार, हॉलिवूड वॉक ऑफ फेमवर स्टार मिळाल्यानंतर प्रत्येक सेलिब्रिटीला त्याच्या देखभालीसाठी दरवर्षी मोठी रक्कम भरावी लागते. या रकमेचा वापर त्या रस्त्यावरील स्टारची स्वच्छता, सुरक्षा आणि देखभाल यासाठी केला जातो. दीपिका पदुकोणला हा सन्मान टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी सुमारे ८८,००० डॉलर्सचा खर्च येणार आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम अंदाजे ७३ लाख रुपये इतकी आहे. एका सन्मासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करणाऱ्या दीपिकाची एकूण संपत्ती तितकीच जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोणची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
दरम्यान दीपिका लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. यात ती अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. त्यासोबतच दीपिका आणि शाहरुख खान यांचाही एक नवीन चित्रपट येणार असल्याचे बोललं जात आहे. दीपिका पादुकोण चित्रपटांव्यतिरिक्त जाहिराती, स्वतःचे ब्रँड्स आणि प्रॉडक्शन हाऊसद्वारे मोठी कमाई करते.
