AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sidharth-Kiara Breakup | सिद्धार्थ-कियारा यांच्या ब्रेकअपच्या चर्चा, चाहत्यांना मोठा धक्का…

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे ब्रेकअप (Breakup) होईल आणि कधी कोणाचे सूत जोळून येतील याचा काहीही नेम नसतो. बॉलिवूडमध्ये बिघडलेल्या नात्याचे अनेक किस्से आहेत. काही काळापासून बॉलिवूडमध्ये (Bollywood) सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे अफेअर असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांनाही अनेक ठिकाणी एकत्र बघितले गेले होते.

Sidharth-Kiara Breakup | सिद्धार्थ-कियारा यांच्या ब्रेकअपच्या चर्चा, चाहत्यांना मोठा धक्का...
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 23, 2022 | 11:25 AM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे ब्रेकअप (Breakup) होईल आणि कधी कोणाचे सूत जोळून येतील याचा काहीही नेम नसतो. बॉलिवूडमध्ये बिघडलेल्या नात्याचे अनेक किस्से आहेत. काही काळापासून बॉलिवूडमध्ये (Bollywood) सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे अफेअर असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांनाही अनेक ठिकाणी एकत्र बघितले गेले होते. परंतु सिद्धार्थ आणि कियारा यांनी कधीही आपल्या नात्यावर (Relationships) भाष्य केले नाही. फक्त आम्ही चांगले मित्र असल्याचे ते सांगत होते. परंतू आता सिद्धार्थ आणि कियारा यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येते आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

दोघांनी ऐकमेंकांना बोलणे केले बंद

बॉलिवूड लाईफला जवळच्या सूत्रांकडून समजले आहे की, दोघांमध्ये सर्व काही ठीक नाहीये. दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. सिद्धार्थ आणि कियारा यांनी एकमेंकांना बोलणे देखील बंद केल्याचे सांगितले जात आहे. यामागचे नेमके कारण काय याबाबत जास्त माहिती मिळू शकलेली नाहीये. सूत्राने पुढे सांगितले की, सिद्धार्थ आणि कियारा यांचे एकमेकांशी चांगले बॉन्डिंग आहे आणि मध्यंतरी अशा बातम्याही आल्या होत्या की दोघेही लग्न करू शकतात. मात्र, आता त्यांच्यामध्ये मतभेद झाल्याची चर्चा आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या चाहत्यांना धक्का

सिद्धार्थ आणि कियारा शेरशाह चित्रपटात एकत्र दिसले होते. दोघांच्या या चित्रपटाला चाहत्यांचे खूप जास्त प्रेम मिळाले. यामध्ये सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. सध्या सिद्धार्थकडे तीन चित्रपट आहेत. योद्धा, मिशन मजनू आणि थँक गॉडमध्ये तो दिसणार आहे. कियाराबद्दल सांगायचे तर, तिच्याकडे सध्या 4 चित्रपट आहेत. यामध्ये भूलभुलैया 2, गोविंदा नाम मेरा, RC 15 आणि जुग जुग जिओ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.

संबंधित बातम्या : 

Alia-Ranbir : बाब्बोव, रणबीरनं जेवढे पैसे बुटासाठी ‘करवल्यांना’ दिले तेवढ्यात श्रीमंतांचं लग्न लागेल, बघा नेमका आकडा !

No Bindi, No Business : टिकली नाही तर धंदा नाही, करीना कपूरची मलाबार गोल्डची जाहिरात वादात, हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप, ट्विटरवर ट्रेंड

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.