Fatima Sana Shaikh: आयराच्या बर्थडे पार्टीतील ‘त्या’ फोटोमुळे फातिमा-आमिरची पुन्हा होतेय चर्चा

Fatima Sana Shaikh: आयराच्या बर्थडे पार्टीतील 'त्या' फोटोमुळे फातिमा-आमिरची पुन्हा होतेय चर्चा
आमिर खानच्या मुलीच्या बर्थडे पार्टीला फातिमाची हजेरी
Image Credit source: Instagram

आयराने (Ira Khan) बिकिनीतील फोटो पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल दिलं होतं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता तिने पार्टीतील आणखी काही फोटो पोस्ट केले आणि नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. आयराने पोस्ट केलेल्या या फोटोंपैकी एका फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 15, 2022 | 9:10 AM

अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) हिने नुकताच 25 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. आयराने बिकिनीतील फोटो पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल दिलं होतं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता तिने पार्टीतील आणखी काही फोटो पोस्ट केले आणि नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. आयराने पोस्ट केलेल्या या फोटोंपैकी एका फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. हा फोटो आहे ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिचा. आमिरच्या लेकीच्या वाढदिवसाला फातिमाची खास हजेरी पाहून पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे. फातिमाने आमिरच्या ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर अनेकदा तिचं नाव आमिरशी जोडलं गेलं. इतकंच नव्हे तर फातिमामुळेच आमिरने किरण रावला घटस्फोट दिल्याची चर्चा होती.

‘जर तुमचं ट्रोलिंग आणि टीका करून झालं असेल तर हे घ्या, माझ्या वाढदिवसाचे आणखी काही फोटो’, असं कॅप्शन देत आयराने हे फोटो पोस्ट केले आहेत. यातील शेवटच्या स्लाइडमध्ये आयरा ही फातिमाच्या गालावर किस करतानाचा फोटो पहायला मिळत आहे. यावरूनच हे समजतंय की आयरा आणि फातिमा यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. आयराच्या बर्थडे पार्टीला बॉयफ्रेंडसह फक्त तिचे जवळचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय उपस्थित होते. आमिर खान, आमिरची पहिली पत्नी आणि आयराची आई रिना दत्त, आमिर-किरणचा मुलगा आणि आयराचा छोटा भाऊ आझादसुद्धा या पार्टीला उपस्थित होते. मात्र किरण राव या पार्टीत कुठेच दिसली नाही. आयराच्या बर्थडे पार्टीला फातिमा हजर राहिल्याने पुन्हा एकदा आमिरचं नाव तिच्याशी जोडलं जातंय.

पहा फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

15 वर्षांच्या संसारानंतर आमिर आणि किरण यांनी घटस्फोट घेतला. 2005 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. आमिर आणि किरण यांनी ज्यावेळी घटस्फोट जाहीर केला, त्यावेळी ट्विटरवर अचानक फातिमाचं नाव ट्रेंड होऊ लागलं होतं. ‘दंगल’ आणि ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटांनंतर आमिर आणि फातिमा यांच्यात काहीतरी शिजत असल्याची जोरजार चर्चा होती. मात्र फातिमाने वेळोवेळो या चर्चांना अफवा असल्याचं म्हणत नाकारलं होतं.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें