याला म्हणतात डान्स, बॉलिवूडच्या प्रचंड वादग्रस्त गाण्यावर गौतमीचा हटके डान्स, स्टेप पाहूनच चाहते घायाळ, Video

गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी पाटील तिच्या डान्समुळे चर्चेत आहे. अशातच तिने काही दिवसांपूर्वी एका बॉलिवूडच्या प्रचंड वादग्रस्त गाण्यावर डान्स केला आहे. ज्यामधील स्टेपने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

याला म्हणतात डान्स, बॉलिवूडच्या प्रचंड वादग्रस्त गाण्यावर गौतमीचा हटके डान्स, स्टेप पाहूनच चाहते घायाळ, Video
| Updated on: May 02, 2026 | 1:47 PM

Gautami Patil Video : महाराष्ट्राची सर्वात लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या डान्समुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. ती नेहमी तिच्या हटके स्टेप आणि तिने निवडलेल्या गाण्यामुळे ती प्रचंड चर्चेत असते. अशातच आता ती पुन्हा एकदा तिच्या हटके स्टेप आणि गाण्यामुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटीने काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या सर्वात वादग्रस्त गाण्यावर डान्स केला आहे. तिचा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहे.

सबसे कातील गौतमी पाटील ही तिच्या दमदार आणि ऊर्जा भरलेल्या सादरीकरणासाठी ओळखली जाते. गौतमी यावेळी बॉलिवूडमधील गाजलेल्या गाण्यावर ठेका धरताना दिसली. विशेष म्हणजे तिने माधुरी दीक्षितच्या प्रसिद्ध ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर सादर केलेल्या नृत्यामुळे सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

गाजलेल्या गाण्यावर भन्नाट परफॉर्मन्स

‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे खलनायक या 1993 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील आहे. या गाण्यावर गौतमीने आपल्या खास स्टाइलमध्ये केलेला डान्स सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. तिच्या स्टेप्स, एक्सप्रेशन्स आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले. तिच्या या डान्स पाहून अनेकांनी माधुरीला टक्कर अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गौतमी पाटीलच्या या परफॉर्मन्समध्ये तिची मंचावरील मजबूत पकड स्पष्टपणे दिसून आली. गाण्याच्या तालावर तिने केलेल्या अचूक स्टेप्स आणि भावपूर्ण हावभावांनी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तिच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळाच रंग आला.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

गौतमीच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या आत्मविश्वासाचे आणि धडाकेबाज डान्सचे भरभरून कौतुक केले आहे.

काही चाहत्यांनी गौतमीने माधुरीच्या गाण्याला वेगळाच अंदाज दिला अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर काहींनी तिच्या स्टेज प्रेझेन्सचे विशेष कौतुक केले आहे. तिच्या प्रत्येक परफॉर्मन्सप्रमाणे यावेळीही प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या काही वर्षांत गौतमी पाटीलचे नाव महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

Follow Us