AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : भारताचा वनडे मालिकेत अफगाणिस्तानला व्हाईट वॉश, तिसऱ्या सामन्यात 9 विकेटने नमवलं

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकली. तिसऱ्या वनडे मालिकेत भारताने 9 गडी राखून विजय मिळवला.

IND vs AFG : भारताचा वनडे मालिकेत अफगाणिस्तानला व्हाईट वॉश, तिसऱ्या सामन्यात 9 विकेटने नमवलं
IND vs AFG : भारताचा वनडे मालिकेत अफगाणिस्तानला व्हाईट वॉश, तिसऱ्या सामन्यात नमवलंImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 20, 2026 | 7:59 PM
Share

भारताने अफगाणिस्तानला तिसऱ्या वनडे सामन्यात 9 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 1 गडी गमवून पूर्ण केलं. 22.4 षटकात हे आव्हान पूर्ण करत अफगाणिस्तानला लोळवलं. या विजयासह भारताने अफगाणिस्तानला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 ने मात देत व्हाईट वॉश दिला. कसोटी सामन्यानंतर भारताने वनडे मालिकेत अफगाणिस्तानला मात दिली आहे. विजयी धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक पण सावध सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 69 चेंडूनत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. त्यामुळे सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकला आणि त्याचा निकालही तसाच लागला. यशस्वी जयस्वालने या सामन्यात 83 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याने षटकार मारून शतक पूर्ण केलं. या आधीच्या सामन्यात फक्त 4 धावा करून बाद झाला होता. पण त्याची पूर्ण भरपाई या सामन्यात केली.

भारताने गोलंदाजी कशी कामगिरी केली?

भारताकडून गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजी केली. त्याने 8.2 षटकात 23 धावा देत 5 गडी बाद केले. यात 2 षटकं निर्धाव टाकली. तर गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट काढली. तसेच दोन विकेट धावचीत स्वरूपात मिळाले. अफगाणिस्ताकडून हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरझाई वगळता एकही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही. हशमतुल्लाहने 131 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकार मारत 102 धावा केल्या. तर अझमतुल्लाह ओमरझाईने 56 चेंडूत 50 धावांची खेळी केली.

मालिकेत काय घडलं?

भारत अफगाणिस्तान पहिल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हा सामना 25 षटकांचा झाला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने 194 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 22.5 षटकात 7 विकेट राखून पूर्ण केलं होतं.. तर दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 402 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना अफगाणिस्तानचा संघ 232 धावा करू शकला. हा सामना अफगाणिस्तानने 170 धावांनी जिंकला.

Follow Us
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल