Thalaivii : कंगना रनौतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ तारखेला रिलीज होणार ‘थलायवी’

'थलायवी' चित्रपटाच्या निर्मात्यांनी कंगनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. (Good news for Kangana Ranaut fans, 'Thalaivii' to be released on this day)

Thalaivii : कंगना रनौतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' तारखेला रिलीज होणार 'थलायवी'

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचे (Kangana Ranaut) चाहते तिच्या ‘थलायवी‘ या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. दररोज कंगनाला ‘थलायवी’ कधी रिलीज होणार अशी विचारणा केली जाते. आज म्हणजेच सोमवारी, ‘थलायवी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी कंगनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. कंगना रनौतचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 10 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

थलायवीचं नवीन पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

अभिनेत्री कंगना रनौतनं तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यासोबतच तिनं चित्रपटाचं एक पोस्टरही शेअर केलं आहे. हे पोस्टर अतिशय रंजक आहे, ज्यात अभिनेता अरविंद स्वामी देखील दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना कंगनाने लिहिलं – या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाची कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यास पात्र आहे. थलायवीसाठी मार्ग तयार करा, कारण तो सिनेमाच्या जगात सुपरस्टार एंट्री करण्यासाठी सज्ज आहे. या ठिकाणी तो नेहमी प्रबळ राहिला आहे. थलायवी 10 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात रिलीज होत आहे.

कंगनाचा हा चित्रपट आधी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल असा अंदाज बांधला जात होता, मात्र कंगनानं नुकतंच दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट फेटाळून लावली होती. कंगनानं स्पष्टपणे सांगितलं होतं की तिचा चित्रपट फक्त चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होईल. याशिवाय, चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळीही कंगनानं चित्रपट फक्त चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा आग्रह धरला.

संबंधित बातम्या

‘सालार’चं आणखी एक दणकट पोस्टर पाहिलात का? प्रभासच्या नव्या फिल्मची उत्सुकता, केजीएफच्या फॅन्ससाठी नवी पर्वणी

Birthday Special : 2006 च्या ‘लॅक्मे फॅशन शो’ दरम्यान Oops Moment ते बिग बॉसचं विजेते पद, असा आहे गौहर खानचा फिल्मी प्रवास

Majhi Tujhi Reshimgath : भेटायला येतेय परी आणि नेहाची हटके जोडी, प्रार्थना बेहेरेनं शेअर केला खास व्हिडीओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI