Happy Birthday Karisma Kapoor | ‘बच्चन’ घराण्याची सून बनणार होती करिश्मा कपूर, ‘या’ कारणामुळे तुटला अभिषेकसोबतचा साखरपुडा!

तिच्या काळात करिश्मा सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती. करिश्माने वयाच्या 17व्या वर्षी ‘प्रेम कैदी’ या रोमँटिक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पहिल्याच चित्रपटापासून करिश्माने तिचे अभिनयातील वर्चस्व दाखवले. यानंतर अभिनेत्रीने ‘दिल तो पागल है’, ‘हम साथ साथ हैं’, ‘बीवी नंबर 1’, ‘फिजा’ आणि ‘राजा हिंदुस्तानी’ अशा अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत.

Happy Birthday Karisma Kapoor | ‘बच्चन’ घराण्याची सून बनणार होती करिश्मा कपूर, ‘या’ कारणामुळे तुटला अभिषेकसोबतचा साखरपुडा!
करिश्मा कपूर

मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही बॉलिवूडचे लोकप्रिय कुटुंब म्हणजेच कपूर घराण्यातील मुलगी आहे. करिश्मा कपूर कुटुंबातील पहिली मुलगी आहे, जिने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले. 90 आणि 2000च्या दशकांत करिश्माने आपल्या अभिनयाने अशी जादू केली होती की, प्रत्येकजण तिच्या अदांचा दिवाना झाला होता (Happy Birthday Karisma Kapoor know why karisma breaks relations with Abhishek Bachchan).

तिच्या काळात करिश्मा सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती. करिश्माने वयाच्या 17व्या वर्षी ‘प्रेम कैदी’ या रोमँटिक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पहिल्याच चित्रपटापासून करिश्माने तिचे अभिनयातील वर्चस्व दाखवले. यानंतर अभिनेत्रीने ‘दिल तो पागल है’, ‘हम साथ साथ हैं’, ‘बीवी नंबर 1’, ‘फिजा’ आणि ‘राजा हिंदुस्तानी’ अशा अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत.

करिश्मा तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे जितकी चर्चेत राहिली होती, तितकीच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. करिश्मा कपूर एकेकाळी बच्चन कुटुंबाची सून होणार होती. तिचा आणि अभिषेक बच्चनचा साखरपुडा देखील झाला होता, पण त्यानंतर अचानक हा साखरपुडा मोडला.

नेमकं काय झालं?

राज कपूर यांचे नातू निखिल नंदा यांनी अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनशी लग्न केले, म्हणून बच्चन आणि कपूर कुटुंब आधीपासूनच नातलग आहेत. रिपोर्ट्सनुसार अभिषेक (Abhishek Bachchan) आणि करिश्माच्या रिलेशनशिपच्या बातम्या त्यांच्या लग्नादरम्यानच येऊ लागल्या होत्या. दोघे बर्‍याच वर्षांपासून एकत्र होते आणि मग दोघांनीही आपलं नातं पुढच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला. यानंतर या दोघांच्या साखरपुड्याची घोषणा झाली. करिश्मा म्हणाली होती, ‘बच्चन कुटूंबाचा एक भाग होणं खरंच आश्चर्यकारक वाटतं.’ परंतु कोणाला माहित होते की, ही अद्भुत भावना फार काळ टिकणार नाही आणि त्यांचा साखरपुडा मोडेल.

कारण अस्पष्टच!

त्यावेळी हा साखरपुडा मोडण्याचे करण्याचे कारण समोर आले नाही. तथापि, अनेक अफवा उडाल्या होत्या. कॉस्मोपॉलिटनच्या अहवालानुसार, करिश्माची आई बबिता यांना असे वाटले की, करिश्मा अभिषेकपेक्षा करिअरमध्ये अधिक यशस्वी आहे, म्हणूनच त्यांनी हे लग्न मोडण्याचे ठरवले. त्याचबरोबर काही बातमींनुसार करिश्माला लग्नानंतर करिअर सोडण्यास सांगितले जात होते, त्यामुळे तिने हा साखरपुडा मोडण्याचे ठरवले.

आपापल्या आयुष्यात व्यस्त

तथापि, याचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण, दोघांनीही आता त्यांच्या पुढच्या आयुष्याकडे वाटचाल केली आहे. त्यानंतर अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केले आणि आज हे कुटुंब आपली मुलगी आराध्यासमवेत आयुष्याचा आनंद घेत आहे. त्याचवेळी करिश्माने संजय कपूरसोबत लग्न केले, पण काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. आजच्या घडीला करिश्मा ही सिंगल मदर आहे आणि मुलांसमवेत वेळ घालवत आहे.

(Happy Birthday Karisma Kapoor know why Karisma breaks relations with Abhishek Bachchan)

हेही वाचा :

Happy Birthday Satish Shah | दूरदर्शनच्या शोमध्ये सतीश शहांनी साकारलेल्या तब्बल 60 भूमिका, जाणून घ्या त्यांच्यासंबंधित काही खास गोष्टी…

मॅटाडोर, गन आणि फिरते रेस्टॉरंट, असा चित्रित झाला ‘नसीब’ चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI