मॅटाडोर, गन आणि फिरते रेस्टॉरंट, असा चित्रित झाला ‘नसीब’ चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चाहत्यांची यादी तशी खूपच लांबलचक आहे. महानायकाच्या अभिनयामुळे सर्व वयोगटातील लोक त्यांचे चाहते आहेत. अमिताभ यांनी आतापर्यंत आपल्या प्रख्यात कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे.

मॅटाडोर, गन आणि फिरते रेस्टॉरंट, असा चित्रित झाला ‘नसीब’ चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन!
अमिताभ बच्चन

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चाहत्यांची यादी तशी खूपच लांबलचक आहे. महानायकाच्या अभिनयामुळे सर्व वयोगटातील लोक त्यांचे चाहते आहेत. अमिताभ यांनी आतापर्यंत आपल्या प्रख्यात कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असतात. यामुळेच ते चाहत्यांसमोर सोशल मीडियाद्वारे खास गोष्टी शेअर करत असतात (Naseeb Film climax seen story shared by Amitabh Bachchan).

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘दीवार’ चित्रपटाशी संबंधित एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला होता. ज्यानंतर अभिनेत्याने आता आपल्या चित्रपटाशी संबंधित आणखी एक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी 1981 साली रिलीज झालेल्या ‘नसीब’ चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनचे गुपित सांगितले आहे.

कसा चित्रित झाला ‘नशीब’चा क्लायमॅक्स सीन

अमिताभ यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहते. पोस्टमध्ये त्यांनी ‘नसीब’ चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनबद्दल सांगितले आहे. अमिताभ यांनी सांगितले की, ‘मॅटाडोर आणि गन, नसीबचा क्लायमॅक्स सीन एका फिरत्या रेस्टॉरंटमध्ये चित्रीकरण करण्यात आले होते. फिरत्या रेस्टॉरंटमध्ये अ‍ॅक्शन सीन्स, नाटकं चित्रित केली गेली होती. चांदीवली स्टुडिओत एक सेट तयार केला होता आणि तो फिरवण्यात आला होता. हे काम फक्त महान मनमोहन देसाईंनीच केला असता आणि ते यशस्वी देखील झाले आणि मी 80च्या दशकाबद्दल बोलत आहे, जेव्हा व्हीएफएक्स नव्हते आणि सीजी काहीही नव्हते. ते दिवस सुंदर होते…’

पाहा पोस्ट

अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही नवीन माहिती जाणून चाहत्यांना फार आनंद झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर आता चाहत्यांनी जोरदार लाईक्स व कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे.

अलीकडेच अमिताभने ‘दीवार’ चित्रपटाशी संबंधित एक खास किस्सा चाहत्यांसह शेअर केला होता आणि चित्रपटात शर्ट लांब असल्यामुळे त्यांनी त्याची कशी गाठ बांधली, हे सांगितले होते. याआधी ही शर्टाची गाठ केवळ एक फॅशन समजली जात होती. अमिताभ बच्चन यांची ही पोस्टही खूप व्हायरल झाली.

अमिताभ बच्चन लवकरच इमरान हाश्मीसमवेत ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहेत. ‘चेहरे’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. बिग बी लवकरच ‘गुडबाय’, ‘चेहरे’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. यासह आता अभिनेता ‘कौन बनेगा करोडपती’च्या शुटिंगलाही सुरुवात करणार आहेत.

(Naseeb Film climax seen story shared by Amitabh Bachchan)

हेही वाचा :

Love story | नेहमीच हीना खानचा आधार बनला बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल, नॅशनल टीव्हीवर केलं प्रपोज!

राज कुमार रावसोबत काम करू इच्छिते समांथा अक्किनेनी, पाहा काय म्हणाली अभिनेत्री…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI