Happy Birthday Kiara Advani | कियारा नाही तर ‘हे’ अभिनेत्रीचं खरं नाव, अभिनयापूर्वी करायची शिक्षक म्हणून काम!

अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आज (31 जुलै) कियारा अडवाणीचा वाढदिवस आहे.

Happy Birthday Kiara Advani | कियारा नाही तर ‘हे’ अभिनेत्रीचं खरं नाव, अभिनयापूर्वी करायची शिक्षक म्हणून काम!
कियारा अडवानी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 31, 2021 | 10:26 AM

मुंबई : अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आज (31 जुलै) कियारा अडवाणीचा वाढदिवस आहे. कियाराचे वडील जगदीप अडवाणी एक मोठे उद्योगपती आहेत. तर, अभिनेत्रीची आई जेनेविझ जाफरी शिक्षिका आहेत. कियारा विशेषतः तिच्या चाहत्यांमध्ये सध्या राहणीमानामुळे ओळखली जाते.

कियाराचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून झाले. एवढेच नाही तर अभिनेत्रीने अभिनयाचे बारकावे अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेतून शिकले आहेत. आज, कियाराच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

कियाराचे मोठ्या पडद्यावर पदार्पण

बऱ्याचदा चाहत्यांना असे वाटते की कियाराने आपल्या करिअरची सुरुवात ‘एमएस धोनी’ या चित्रपटातून केली होती. परंतु, अभिनेत्रीने 2014 मध्ये ‘फुगली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही आणि कियाराला देखील प्रसिद्धी मिळू शकली नाही.

‘या’ व्यक्तीच्या सांगण्यावरून नाव बदलले!

अभिनेत्रीचे खरे नाव कियारा नाही. होय चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी तिचे नाव आलिया अडवाणी असल्याचे अनेक वेळा अभिनेत्रीने स्वतः सांगितले आहे. अभिनेत्रीने सांगितले होते की, सलमान खानच्या सल्ल्याने तिने तिचे नाव आलियावरून बदलून कियारा केले. अभिनेत्रीने तिचे नाव बदलले, कारण आलिया भट्ट आधीच इंडस्ट्रीमध्ये होती आणि ती प्रसिद्धही झाली होती.

का ठेवले कियारा नाव?

एका मुलाखतीत स्वतः कियारा अडवाणीने सांगितले होते की, ‘अंजाना अंजानी’ या चित्रपटातील प्रियंकाच्या पात्राचे नाव कियारा आहे. अभिनेत्रीने सांगितले होते की, ती प्रियंकाच्या या नावामुळे खूप प्रभावित झाली आहे, म्हणून तिने हे नाव स्वतःसाठी निवडले.

सोशल मीडियावर अजूनही खरे नाव

कियाराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नाव आलिया असल्याचे अजूनही चाहत्यांच्या लक्षात आले नसेल. कियारा आपले खरे नाव अर्थात आलिया हे नावाच्या मध्यभागी लावते. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर कियारा आलिया अडवाणी असे नाव ठेवले आहे.

शिक्षक म्हणून काम केले

असे म्हटले जाते की, कियाराच्या आजीने तिला तिच्या करिअरमध्ये कामाचा अनुभव वाढवण्यासाठी शिक्षक म्हणून काम करण्याचा सल्ला दिला होता. कारण, तिला मुलांना शिकवण्याची आवड होती. अभिनेत्रीने कुलाबा येथील अर्ली बर्ड स्कूलमध्ये शिक्षक म्हणूनही काम केले. इथेच तिची आई मुख्याध्यापिका होती.

कियाराचे करिअर

कियाराला 2016च्या ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून ओळख मिळाली. यानंतर अभिनेत्री काही चित्रपटांमध्ये दिसली, पण तिला हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर ‘कबीर सिंह’ या चित्रपटाने अभिनेत्रीला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर अभिनेत्री पुन्हा तिच्या कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. अलीकडेच कियाराच्या ‘शेर शाह’ या नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. विक्रम बत्राच्या जीवनावर आधारित या चित्रपटात ती एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.

(Happy Birthday Kiara Advani know the real name of actress)

हेही वाचा :

धर्माच्या भिंती ओलांडत एकमेकांशी लग्नगाठ बांधणारे दीपिका-शोएब, जाणून घ्या त्यांच्या प्रेमकथेबद्दल…

इंजिनिअर बनण्याची इच्छा असणारी वंदना तिवारी मुंबईत आली अन् गहना वशिष्ठ बनली! 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें