Love Story | धर्माच्या भिंती ओलांडत एकमेकांशी लग्नगाठ बांधणारे दीपिका-शोएब, जाणून घ्या त्यांच्या प्रेमकथेबद्दल…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Rohit Dhamnaskar

Updated on: Jul 31, 2021 | 10:05 AM

जेव्हा जेव्हा खऱ्या प्रेमाबद्दल बोलले जाते, तेव्हा अभिनेत्री दीपिका कक्कर (Deepika Kakkar) आणि शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) या जोडीचे नाव निश्चितच तोंडावर येते.

Love Story | धर्माच्या भिंती ओलांडत एकमेकांशी लग्नगाठ बांधणारे दीपिका-शोएब, जाणून घ्या त्यांच्या प्रेमकथेबद्दल...
दीपिका कक्कर-शोएब इब्राहिम

मुंबई : जेव्हा जेव्हा खऱ्या प्रेमाबद्दल बोलले जाते, तेव्हा अभिनेत्री दीपिका कक्कर (Deepika Kakkar) आणि शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) या जोडीचे नाव निश्चितच तोंडावर येते. दोघेही टीव्ही इंडस्ट्रीमधील परिपूर्ण जोडींपैकी एक आहेत. दोघांनी सिद्ध केले आहे की, एक परिपूर्ण नाते कसे असते. दोघांनाही त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, शोएब आणि दीपिकाने प्रत्येक समस्येवर मात करुन आपले प्रेम जिंकवले आहे.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेच्या शूटिंग दरम्यान दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांची भेट झाली. त्यावेळी दीपिका आधीच विवाहित होती आणि तिच्या लग्नात अडचणी येत होत्या. 2015 मध्ये दीपिका कक्करचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दीपिका आणि शोएब एकमेकांच्या जवळ आले. पण शोएबने शो सोडल्यानंतर दोघांनाही त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली.

सगळ्यांपासून लपवलं होतं नातं

त्यांच्या प्रेमाच्या बातम्या चर्चेत येऊ लागल्या होत्या, परंतु दोघांनीही या प्रकरणात मौन बाळगले. दोघांनी एकमेकांना 3 वर्षे डेट केले आणि मग शेवटी त्यांनी आपले नाते अधिकृत केले. दोघांनी एका मुलाखतीद्वारे त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते.

एकत्र समाजाला सामोरे गेले!

दोघांच्या प्रेमाचा मार्ग इतका सोपा नव्हता. अनेकांनी दीपिकावर प्रश्न उपस्थित केले. दीपिकाचे पहिले लग्न मोडण्याचे कारण हे नाते असल्याचे सांगितले, तर कोणीतरी दोघांच्या वेगवेगळ्या धर्मावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, दोघांनीही सर्वांचा एकत्र सामना केला आणि या गोष्टींना त्यांच्या नात्यात कधीही येऊ दिले नाही.

कायम एकत्र राहण्याचा निर्णय घेतला

बर्‍याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, दोघांनी 2018मध्ये भोपाळमध्ये कुटुंब आणि जवळच्या मित्र परिवारच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. शोएबचे वडील आणि आई यांचे लग्न झाले होते, त्याच घरात या दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर दोघांनी मुंबईत भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती.

फिल्मी रोमान्स

दोघांची प्रेमकथा रोमँटिक आहे. नोक-झोकपासून आकंठ प्रेमापर्यंत, दोन्ही सुखी आणि शांततापूर्ण वैवाहिक जीवनाची परिपूर्ण उदाहरणे आहेत. लग्नानंतरही दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी रोमँटिक डेट्सवर जातात. याशिवाय ते एकमेकांना खास सरप्राईज देतात. यामुळे दोघांच्या वैवाहिक जीवनात आनंद कायम राहतो. दोघेही नेहमी एकमेकांना साथ देतात. प्रत्येक आनंद आणि दुःखात दोघेही एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. केवळ वैयक्तिकच नाही तर, व्यावसायिकदृष्ट्या देखील दोघे एकमेकांना पूर्णपणे पाठिंबा देतात.

(Sasural Simar ka fame couple Deepika Kakkar and Shoaib Ibrahim Love story)

हेही वाचा :

Lookalike : स्वरा भास्करसारखीच दिसते ऋषिता भट्ट, अभिनयाच्या बाबतीतही आहे अव्वल

कधी काळी लग्नसोहळ्यांमध्ये गाणी गायचा, ‘या’ शोमुळे सोनू निगमला मिळाली ओळख!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI