AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंजिनिअर बनण्याची इच्छा असणारी वंदना तिवारी मुंबईत आली अन् गहना वशिष्ठ बनली! वाचा तिचा प्रवास..

अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री आणि दिग्दर्शक गहना वशिष्ठ (Gehana Vashishth) हिचे नाव सध्या खूप चर्चेत आहे. गहना छत्तीसगडमधील छोटेसे गाव कोरियाची रहिवासी आहे.

इंजिनिअर बनण्याची इच्छा असणारी वंदना तिवारी मुंबईत आली अन् गहना वशिष्ठ बनली! वाचा तिचा प्रवास..
गहना वशिष्ठ
| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 9:56 AM
Share

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री आणि दिग्दर्शक गहना वशिष्ठ (Gehana Vashishth) हिचे नाव सध्या खूप चर्चेत आहे. गहना छत्तीसगडमधील छोटेसे गाव कोरियाची रहिवासी आहे. तिचे खरे नाव वंदना तिवारी आहे. तिचे वडील चिरमिरी येथील खाणीत काम करायचे. गहना हिचे शालेय शिक्षण देखील चिरमिरीमधूनच झाले. दैनिक भास्करच्या टीमने गेहनाच्या कुटुंबीयांशी आणि तिला शिकवणाऱ्या शिक्षकांशी नुकताच संवाद साधला होता.

गहनाच्या वडिलांचे नाव रवींद्र तिवारी आहे. तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, सरळ साधी वंदना ग्लॅमरस दुनियेत येऊन अभिनेत्री आणि अश्लील चित्रपटांची दिग्दर्शक गहना वशिष्ठ कशी झाली. तिला शिकवणारे शिक्षक जगदीश सिंह सांगतात की, वंदना खूप हुशार विद्यार्थिनी होती. तिला इंजिनिअर व्हायचे होते. म्हणूनच तिने बारावीत पीसीएम घेतले आणि 71 टक्के गुण देखील मिळवले.

वाटलं नव्हतं ती असल्या चित्रपटात काम करेल!

गहनाला शिकवणारे शिक्षक जगदीश सिंग यांनी सांगितले की, वंदना इतकी लाजाळू होती की, ती नृत्य आणि गाण्यांसारख्या शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात कधीच सहभागी झाली नव्हती. तिच्याकडे पाहून, तिला अभिनय आणि चित्रपट जगतात जायचे आहे, असे कधी वाटले नाही. तिने सांगितले होते की, 2006मध्ये ती भोपाळमध्ये अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी गेली होती. त्यानंतर ती पुन्हा चिरमिरीला परतली नाही.’ त्यांनी सांगितले की, महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तिचे येथे येणे कमी झाले आहे. पण, तिचे कुटुंब येथेच राहते. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे चिरीमिरीला येणे पूर्णपणे बंद झाले आहे.

असे सांगितले जात आहे की, गहना भोपाळमध्ये अभियांत्रिकी शिकत होती, त्या दरम्यान ती मॉडेलिंगकडे आकर्षित होऊ लागली. एक लाजाळू मुलगी यादरम्यान खूप धाडसी बनली. तिने महाविद्यालयातील अनेक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. त्यानंतर तिला हळूहळू मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर ती मुंबईला गेले. त्या काळात वंदनाने तिचे नाव बदलून गहना वशिष्ठ असे केले.

राज कुंद्राच्या वेब सीरीजमध्ये काम

गहनाने बिकिनी सौंदर्य स्पर्धेत आशिया स्तरावर प्रथम स्थान मिळवले होते. या यशानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. गहनाने अनेक बोल्ड बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले. तिने अनेक दक्षिणात्य बोल्ड चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावले होते. या काळात तिला अनेक वेब सीरीजच्या ऑफरही येऊ लागल्या. तिने शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊसमध्येही काम केले. त्यानंतरच तिने अश्लील चित्रपटांचे दिग्दर्शन सुरू केले होते.

गहनाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तिचे पालक तिच्या मॉडेलिंगच्या विरोधात होते. त्यांच्या नकारानंतरही तिने त्यांचे ऐकले नाही. जेव्हा तिच्या कुटुंबाला कळले की, तिने सी-ग्रेडच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे, तेव्हा कुटुंबाला धक्का बसला. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीशी असलेले सर्व संबंध तोडले. अगदी तिच्या कुटुंबियांनी तिला ओळखण्यास नकार दिला होता.

(Vandana Tiwari who wanted to become an engineer becames Gehana Vashishth know about her journey)

हेही वाचा :

सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, कॉमेडीयन ‘बिग बॉस 15’मध्ये सहभागी होण्याची शक्यता!

पहिल्याच चित्रपटातील बोल्ड सीनमुळे मंदाकिनी चर्चेत, अंडरवर्ल्ड डॉनसोबतही जुळलेले सूर!  

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.