Shilpa Shetty Defamation Case: शिल्पा शेट्टीला मोठा धक्का, अभिनेत्रीच्या मागण्या हायकोर्टाने फेटाळल्या!

‘आपल्या देशात पत्रकारीतेला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तसेच आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्रही आहे. पत्रकारीता ही जबाबदारीपूर्णच असायला हवी, मात्र त्यात कोर्ट निर्देश देऊ शकत नाही.’ या युक्तिवादाने शिल्पा शेट्टीच्या मागण्या हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.

Shilpa Shetty Defamation Case: शिल्पा शेट्टीला मोठा धक्का, अभिनेत्रीच्या मागण्या हायकोर्टाने फेटाळल्या!
Shilpa Shetty

मुंबई : राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही त्याची पत्नी आहे. त्यामुळे राज याला अटक केल्यानंतर या प्रकरणाशी शिल्पा हिचाही संबंध लावला जात आहे. मात्र, या घटनेशी आपला काहीही संबंध नाही, असं शिल्पा सांगत आहे. यानंतरही तिच्या विरोधात काही चॅनेल आणि युट्यूब चॅनेलवर शिल्पा हिचा संबंध लावून बातम्या येत आहेत. या विरोधात शिल्पा शेट्टी हिने मुंबई हायकोर्टात सिव्हिल सूट दाखल केला होता. या याचिकेत तिने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या.

या प्रकरणी आज (30 जुलै) सुनावणी पार पडली. यात शिल्पाच्या सगळ्या मागण्या फेटाळून लावण्यात आल्या. शिल्पा शेट्टीला सध्या कोणताही अंतरिम दिलासा देता येणार नाही, असं हायकोर्टनं म्हटलं आहे.

एका रिपोर्टमध्ये शिल्पाच्या अश्रुंना ‘मगरमच्छ के आंसू’ म्हणून संबोधण्यात आलंय. आम्ही कोणावर बंदी घालण्याची मागणी करत नाही, मात्र वैयक्तिक पातळीवर टिका टिप्पणी नसावी, असे शिल्पाच्या वकिलांनी म्हटले होते. यावर उत्तर देताना हायकोर्टाने म्हटले की, ‘आपल्या देशात पत्रकारीतेला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तसेच आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्रही आहे. पत्रकारीता ही जबाबदारीपूर्णच असायला हवी, मात्र त्यात कोर्ट निर्देश देऊ शकत नाही.’ या युक्तिवादाने शिल्पा शेट्टीच्या मागण्या हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.

काय होत्या शिल्पा शेट्टीच्या मागण्या?

शिल्पाने याचिकेत 29 जणांना प्रतिवादी केलं आहे. हे प्रतिवादी काही चॅनलचे प्रमुख आहेत. युट्यूब चॅनेलचे प्रमुख आहेत. यात तिने म्हटले होते की, काही चॅनेल आणि युट्यूब चॅनेलला आपल्या बाबत विसंगत माहिती देण्यास बंदी करावी, अशी मागणी शिल्पा हिने केली होती.

मात्र, पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्वाचा भाग आहे. आम्ही त्यांनी काय छापावं आणि काय नाही, हे सांगू शकत नाही. मात्र, पत्रकारिता जबाबदारीने व्हायला हवी, असे कोर्टाने म्हटले आहे.

शिल्पाच्या वकीलांचा युक्तिवाद

शिल्पा शेट्टी हीचा राज कुंद्रा केसशी कहीही संबंध नाही. मात्र, यानंतरही शिल्पाचा संबंध त्या केसशी जोडला जातोय. तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं आहे. हे चुकीचं आहे. हे थांबवायला हवं. त्यासाठी आम्ही कोर्टात आलो आहोत. आम्ही त्यांच्यावर बंदी घाला असं म्हणत नाही, आम्ही केवळ आमच्याबाबत बदनामी करणारा मजकूर प्रसारित करण्यास मनाई करा, अस म्हणतोय. याप्रकरणी फेसबुक, ट्विट, इन्स्टाग्राम, युट्यूब या कंपन्यांना सूचना द्याव्यात. आमच्या विरोधात बदनामीकारक मजकूर, बातम्या प्रसिद्ध करू नयेत, असे आदेश द्यावेत, अशी मागणी शिल्पाच्यावतीने करण्यात आली होती.

(Shilpa Shetty Defamation Case demands of the actress were rejected by the High Court)

हेही वाचा :

पुन्हा एकदा शमिता शेट्टी बहीण शिल्पाच्या समर्थनात, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली…

Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीवर प्रश्नचिन्ह, ‘हंगामा 2’चे निर्माते म्हणतात…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI