Happy Birthday Manoj Joshi | विनोदी शैलीने तब्बल दोन दशकं केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, ‘पद्मश्री’ पुरस्कारावरही कोरलं गेलं मनोज जोशींचं नाव!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 03, 2021 | 7:43 AM

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) आज (3 सप्टेंबर) त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मनोज जोशी यांचा जन्म 3 सप्टेंबर 1965 रोजी झाला आणि आज ते त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.

Happy Birthday Manoj Joshi | विनोदी शैलीने तब्बल दोन दशकं केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, ‘पद्मश्री’ पुरस्कारावरही कोरलं गेलं मनोज जोशींचं नाव!
मनोज जोशी

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) आज (3 सप्टेंबर) त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मनोज जोशी यांचा जन्म 3 सप्टेंबर 1965 रोजी झाला आणि आज ते त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मनोज जोशी हे नाव तसे नवीन नाही. ‘सरफरोश’पासून सुरू झालेला त्यांचा चित्रपट प्रवास अजूनही चालू आहे आणि गेल्या दोन दशकांपासून ते आपल्या अभिनयाने मने जिंकत आहेत.

अभिनेता मनोज जोशींबद्दल असे म्हणता येईल की, ते असे कलाकार आहेत, जे कोणत्याही चित्रपटातील मुख्य अभिनेता नसून, त्यातील सीन्सचे नायक आहे. चित्रपटाच्या दृश्यात ते आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मनोज जोशी यांचा जन्म 3 सप्टेंबर 1965 रोजी गुजरातच्या हिम्मत नगरमध्ये झाला. त्यांनी मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. याशिवाय त्यांनी हिंदी आणि गुजराती भरपूर रंगभूमीवरही काम केले.

पहिल्याच चित्रपटात दाखवली अभिनयाची चुणूक

त्यांचा पहिला चित्रपट सरफरोश होता ज्यात आमिर खान आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे मातब्बर कलाकार होते. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली. त्याने केवळ चित्रपटांमध्येच नव्हे, तर छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मनोज जोशी छोट्या पडद्यावर ‘चाणक्य’, ‘एक महल हो सपने का’, ‘खिचडी’ आणि ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या सारख्या अनेक मालिकांमध्ये दिसले आहेत.

‘पद्मश्री’वर कोरले नाव

त्यांच्या नव्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, मनोज जोशी 2019मध्ये प्रदर्शित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिक असणाऱ्या चित्रपटात अमित शाहंची भूमिका करताना दिसले. भारतीय चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल मनोज जोशी यांना 2018मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. ज्येष्ठ कलाकार मनोज जोशी यांना राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले. मनोज जोशी 1990मध्ये प्रदर्शित झालेल्या मालिकेतील चाणक्यच्या भूमिकेसाठी अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ते बऱ्याच काळापासून रंगभूमीशी जोडलेले आहेत.

आठवणीत राहणारे चित्रपट

मनोजने हिंदी चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय पात्र साकारली आहेत. त्यांनी ‘देवदास’मध्ये शाहरुख खानच्या मोठ्या भावाची भूमिका केली होती. सलमानसोबत त्याच्या ‘क्यूं की’ चित्रपटात काम केले. मनोज यांनी बॉलिवूडमध्ये ‘गरम मसाला’, ‘भागम-भाग’ आणि ‘हसल’सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांद्वारे आपला ठसा उमटवला आहे. तो भयपट सीरियल ‘वो’मध्ये देखील दिसले होते. मनोज जोशी यांना त्यांची खरी ओळख 2003च्या ‘हंगामा’ चित्रपटातून मिळाली. यानंतर, ते ‘हसल’, ‘भूल भुलैया’, ‘फिर हेरा फेरी’ आणि ‘चुप-चुप के’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसले.

हेही वाचा :

सिद्धार्थचा जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणतो “आयुष्य खूप मोठं आहे, पुन्हा भेटू”, चाहते भावूक

Sidharth Shukla Passes Away | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, सोशल मीडिया शोकाकुल, चाहते म्हणाले विश्वास बसत नाही

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI