Sidharth Shukla Passes Away | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, सोशल मीडिया शोकाकुल, चाहते म्हणाले विश्वास बसत नाही

टीव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ शुक्ला याच आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाने अचानक जगाची एक्झिट घेतल्याने संपूर्ण इंडस्ट्रीसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Sidharth Shukla Passes Away | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, सोशल मीडिया शोकाकुल, चाहते म्हणाले विश्वास बसत नाही
Sidharth Shukla

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ शुक्ला याच आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाने अचानक जगाची एक्झिट घेतल्याने संपूर्ण इंडस्ट्रीसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉस- 13 चा विजेताही राहिला आहे. यासोबतच त्याने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट टीव्ही कलाकारांमध्ये त्यांची गणना होते होती. गेल्या काही काळापासून तो अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही दिसत होता. तसेच, अलीकडेच अभिनेत्याने डिजीटल प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केले. जिथे तो “ब्रोकन बट ब्यूटीफुल” मध्ये दिसून आला. सिद्धार्थला या मालिकेसाठी बरीच प्रशंसा मिळाली.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पोहोचताच सोशल मीडियावरील जनता शोकाकुल झाली आहे. सध्या इंटरनेट जगात सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची बातमी ऐकून सोशल मीडियावरील लोक स्तब्ध झाले आहेत. बऱ्याच लोकांचा विश्वासही बसत नाहीये की ज्या कलाकाराने आपल्या अभिनयाने त्यांच्या हृदयामध्ये एक विशेष स्थान निर्माण केले आहे तो आता या जगात नाही.

सिद्धार्थ शुक्लाला टीव्ही मालिका “बालिका वधू”मधून लोकप्रियता मिळाली होती. मग त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. यानंतर तो दिल से दिल तक या मालिकेतही दिसला. त्याने हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे. त्याचे चाहते सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

‘तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवता, सलाम!’, सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट फ्रंटलाईन योध्यांसाठी!

Sidharth Shukla Passes Away | आलिशान गाडी, मुंबईत फ्लॅट, कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक होता सिद्धार्थ शुक्ला, जाणून घ्या एकूण मालमत्ता

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI