AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy birthday Pawan Kalyan | 16 वर्षांत तीन वेळा लग्न बंधनात अडकला, आता अभिनयासोबत राजकारणातही सक्रिय पवन कल्याण

2 सप्टेंबर 1971 रोजी जन्मलेला दक्षिण भारतीय सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan) यावर्षी आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. पावन कल्याण दक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा मेगास्टार चिरंजीवीचा धाकटा भाऊ आहे.

Happy birthday Pawan Kalyan | 16 वर्षांत तीन वेळा लग्न बंधनात अडकला, आता अभिनयासोबत राजकारणातही सक्रिय पवन कल्याण
पवन कल्याण
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 7:35 AM
Share

मुंबई : 2 सप्टेंबर 1971 रोजी जन्मलेला दक्षिण भारतीय सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan) यावर्षी आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. पावन कल्याण दक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा मेगास्टार चिरंजीवीचा धाकटा भाऊ आहे. पवनचा जन्म बपतला येथे झाला होता आणि त्याचे खरे नाव कोन्निडेला कल्याण बाबू असे आहे. मात्र, त्याचे पडद्यावरचे नाव पवन कल्याण आहे आणि तो दक्षिण चित्रपटातील पॉवर स्टार म्हणून ओळखला जातो.

पवन हा दक्षिण चित्रपटसृष्टीचा स्टार आहे, ज्याने आता राजकारणात प्रवेश केला आणि तिथेही प्रसिद्ध झाला आहे. त्याने 1997 मध्ये ‘गोकुलामालो सीता’ या तेलगू चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. यानंतर त्याने ‘बद्री’, ‘जॉनी’, ‘अन्नावरम’, ‘पुली’ आणि ‘गब्बर सिंह’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. दाक्षिणात्य लोकांमध्ये पवन कल्याणची प्रचंड क्रेझ आहे.

16 वर्षात तीन वेळा लग्न

पवन कल्याण राजकारणाबरोबरच चित्रपट मंचावर अष्टपैलुत्वाने समृद्ध आहे. तो एक दिग्दर्शक, गायक आणि पटकथा लेखक देखील आहे. पवन केवळ त्याच्या फिल्मी करिअर आणि राजकारणाबद्दलच चर्चेत नाही, तर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही नेहमी चर्चेत असतो.

पवन कल्याणचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. त्याने 16 वर्षात सुमारे तीन विवाह केले. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव नंदिनी होते, जिच्याशी त्याने 1997 साली लग्न केले. मात्र, लग्नानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याने त्यांनी संबंध तोडले आणि 1999 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

दुसरी पत्नी अन् दोन मुलं

यानंतर रेणू देसाई पवनच्या आयुष्यात आली. दोघांनाही एकमेकांची संगत आवडत होती आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रेणूसोबत पवनचे लग्नही फार काळ टिकले नाही. पवनला रेणू देसाई पासून मुलगा अकीरा आणि मुलगी आध्या अशी दोन मुले आहेत. मात्र, लग्नाच्या तीन वर्षानंतरच दोघांचाही घटस्फोट झाला.

परदेशी महिलेसोबत लग्न

अभिनेता-राजकारणी बनलेल्या पवन कल्याण याने तिसऱ्यांदा एक परदेशी मुलगी ऍना लेजनेवाशी लग्न केले. 2011मध्ये या दोघांची भेट झाली होती. यानंतर दोघांनी लग्न केले आणि त्याच वर्षी तिने देखील एका मुलीला जन्म दिला. त्यांना मार्क शंकर पावनोविच नावाचा एक मुलगा देखील आहे.

राजकारणात सक्रिय

त्याचा मोठा भाऊ चिरंजीवी प्रमाणेच पवननेही राजकारणात प्रवेश केला आणि 2008मध्ये तो ‘प्रजा राज्यम’ या पक्षात सामील झाला. मात्र, काही वर्षांनी पवनने स्वतःचा पक्ष ‘जनसेना’ स्थापन केला. नंतर त्याने भाजपला पाठिंबा दिला आणि सत्ताधारी तेलगू देसम पक्षाच्या सहकार्याने पंतप्रधान मोदींसाठी जोरदार प्रचार केला. तथापि, पवनने आंध्र प्रदेशच्या विशेष दर्जाबाबतच्या वादामुळे भाजपशी असलेले संबंध संपवले. पवन कल्याण सध्या महत्वाचे मुद्दे उपस्थित करत असतो आणि राजकीय व्यासपीठावर देखील सक्रिय असतो.

हेही वाचा :

Bigg Boss Ott: ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात ‘निया दौर’, हटके एन्ट्री करत निया शर्मा बनली लेडी बॉस

‘चला हवा येऊ द्या’ फेम ‘या’ अभिनेत्रीची ऐतिहासिक ‘रावरंभा’ चित्रपटात वर्णी, आता मोठ्या पडद्यावर दाखवणार अभिनयाची जादू!

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.