Happy Birthday PM Narendra Modi | कंगना रनौत ते अक्षय कुमार, बॉलिवूडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

देशभरातील अनेक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Happy Birthday PM Narendra Modi) त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अनेक बॉलिवूड सेलेब्सनीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारपासून कंगना रनौत, विवेक ओबेरॉय, अभिषेक बच्चन आणि अनेक सेलिब्रिटींनी पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Birthday PM Narendra Modi | कंगना रनौत ते अक्षय कुमार, बॉलिवूडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नरेंद्र मोदी

मुंबई : देशभरातील अनेक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Happy Birthday PM Narendra Modi) त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अनेक बॉलिवूड सेलेब्सनीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारपासून कंगना रनौत, विवेक ओबेरॉय, अभिषेक बच्चन आणि अनेक सेलिब्रिटींनी पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (17 सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. आज म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा 71 वा वाढदिवस आहे (PM Modi 71th Birthday). 1950 मध्ये गुजरातच्या वडनगर येथे जन्मलेले नरेंद्र दामोदरदास मोदी, आज जगभरात चर्चेत आहेत.

अक्षय कुमार

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमारने लिहिले की, ‘ तुम्ही नेहमीच मला प्रोत्साहन दिले आणि खूप आशीर्वाद दिले. मी तुमच्यासारखे लिहू शकत नाही, परंतु आज मी तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा देतो. निरोगी राहा, आनंदी राहा, देवाकडे तुमच्यासाठी हीच इच्छा आहे.’

अभिषेक बच्चन

अभिनेते अभिषेक बच्चन यांनी लिहिले,  ‘आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला उज्ज्वल भविष्य आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.’

नेहा धुपिया

पीएम मोदींना शुभेच्छा देताना बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने ट्विटरवर लिहिले की, ‘आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्या जीवनात आरोग्य आणि आनंद कायम असू द्या.’

कंगना रनौत

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि त्यांचे काही फोटो शेअर केले. कंगनाने लिहिले की, ‘जगातील महान नेते नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

रणदीप हुडा

अभिनेता रणदीप हुडा यांनी लिहिले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या 71व्या वाढदिवसाच्या उत्तम आरोग्य आणि शांतीसाठी शुभेच्छा.’

विवेक ओबेरॉय

अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी लिहिले, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भारताची संस्कृती आणि भारताचे तंत्रज्ञानाच्या संगमाने भारताला जागतिक गुरु बनवणारे युगपुरुष..देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो आणि नेहमी निरोगी राहा.. जय हिंद.’

हेही वाचा :

Happy Birthday PM Narendra Modi | पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘हे’ चित्रपट, प्रेक्षकांनीही दिलाय उदंड प्रतिसाद!

IT Survey On Sonu Sood : सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचा सर्व्हे सुरूच, सोनू सूदच्या बेहिशेबी मालमत्तेची होतेय चौकशी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI