धर्मेंद्र यांचा मरणोत्तर पद्मभूषण स्वीकारताना हेमा मालिनी भावुक, सनी-बॉबी देओल गैरहजर का?

Dharmendra Padma Vibhushan : अभिनेत्री हेमा मालिनी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचे पती धर्मेंद्र यांच्यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारला. यावेळी सनी देओल आणि बॉबी देओल उपस्थित का नव्हते याची माहिती समोर आली आहे.

धर्मेंद्र यांचा मरणोत्तर पद्मभूषण स्वीकारताना हेमा मालिनी भावुक, सनी-बॉबी देओल गैरहजर का?
Dharmendra Padma Vibhushan Hema Malini
Image Credit source: Google
| Updated on: May 26, 2026 | 8:00 PM

राष्ट्रपती भवनात सोमवारी पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचे पती धर्मेंद्र यांच्यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारला. या खास प्रसंगी हेमा यांच्यासोबत मुलगी अहाना देओल आणि जावई वैभव वोहरा देखील उपस्थित होते. आपल्या वडिलांना मिळालेला हा सन्मान पाहून अहाना भावूक झाली होती. तर हेमा मालिनी यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले होते. आता या दोघींनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर आपल्या करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून सनी देओल आणि बॉबी देओल या कार्यक्रमाला उपस्थित का नव्हते याची माहितीही समोर आली आहे.

हेमा मालिनींना आली पतीची आठवण

हेमा मालिनी यांनी पती धर्मेंद्र यांच्या पद्म सन्मान स्वीकारतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा क्षण आनंदाने भरलेला होता. मला असं वाटत होतं की, धरमजी माझ्यासोबतच आहेत. जणू त्यांनी माझा हात धरला होता आणि ज्या मंचावर त्यांचा पद्म सन्मान ठेवला होता, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ते मला मदत करत होते. काल पद्म पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती मुर्मू यांनी हा सन्मान प्रदान केला आणि मी तिथे धर्मेंद्रजींचे प्रतिनिधित्व करत होते. त्या क्षणी मला प्रचंड अभिमान वाटत होता. त्यांच्यासोबत मी आयुष्यभराच्या सुंदर आठवणी निर्माण केल्या. सुरुवातीला आम्ही सहकलाकार होतो आणि अनेक हिट चित्रपट दिले. नंतर ते माझे जीवनसाथी बनले.”

पुढे बोलताना हेमा मालिनी यांनी म्हटले की, ‘या सर्व आठवणी डोळ्यांसमोर येताच माझ्या डोळ्यांत अश्रू आले. ते अतिशय प्रेमळ आणि काळजी घेणारे पती होते. एक उत्तम वडील आणि आजोबा होते. तसेच खरे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शकही होते. त्यांच्यात याशिवायही अनेक गुण होते. ते खरोखरच महान व्यक्तिमत्त्व होते. आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या, लाखो चाहत्यांच्या आणि शुभेच्छुकांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारला. देवाचे आभार मानते की त्यांनी मला धरमजींसारखा जीवनसाथी दिला. त्यांच्या आठवणी मी आयुष्यभर जपून ठेवेन.’

ईशा देओलचीही भावूक पोस्ट

ईशा देओलनेही वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. तिने सांगितले तीही आई हेमा मालिनींसोबत या कार्यक्रमाला जाणार होती, मात्र काही कारणामुळे तिला जाता आले नाही. ईशाने लिहिले की, ‘हा क्षण आमच्या कुटुंबासाठी अत्यंत भावनिक होता. आम्हाला वाटत होतं की, काश पापा स्वतः या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असते आणि त्यांनी पांढरा शर्ट व निळा सूट परिधान केला असता.’

इशा देओलने पुढे बोलताना म्हटले की, ‘माझ्या आईने आमच्या संपूर्ण कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत हा पुरस्कार स्वीकारला आणि धाकटी अहानाने पप्पांच्या सर्व मुलांचं प्रतिनिधित्व केलं. तिच्या डोळ्यांत अश्रू होते आणि ती पप्पांच्या सन्मानासाठी टाळ्या वाजवत होती. आमचे वडील, ज्यांच्यावर आम्ही मनापासून प्रेम करतो, त्यांची आम्हाला खूप आठवण येते. ते कायम आमच्या हृदयात जिवंत राहतील.’ इशाने दिलेल्या माहितीनुसार अहानाने धर्मेंद्र यांच्या सर्व मुलांचे प्रतिनिधित्व केले, त्यामुळे सनी आणि बॉबी देओल हे या सोहळ्याला उपस्थित नव्हते.

Follow Us