Richa Chadha | ‘ऋचा चड्ढा’च्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार? गृहमंत्र्यांनी दिले संकेत

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Nov 26, 2022 | 9:51 PM

सोशल मीडियावर ऋचा हिच्या विरोधात मोठी मोहिम सुरू आहे.

Richa Chadha | 'ऋचा चड्ढा'च्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार? गृहमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई : ऋचा चड्ढा हिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ऋचाने गलवानवर केलेल्या त्या विधानावरून मोठा गदारोळ होताना दिसत आहे. फक्त बाॅलिवूडच नाही तर राजकारणातील अनेकांनी ऋचाच्या या विधानाचा निषेध केलाय. सोशल मीडियावर ऋचा हिच्या विरोधात मोठी मोहिम सुरू आहे. अनेकांनी ऋचा हिच्या आगामी चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही केलीये. ऋचाने वादग्रस्त विधानावर अगोदरच माफी मागितली आहे, तरीही हे प्रकरण शांत होण्याचे नाव घेत नाहीये.

आता या सर्व प्रकरणात थेट मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी उडी घेतलीये. इतकेच नाही तर त्यांनी ऋचाच्या मानसिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करत तिचा चांगलाच समाचार घेतला आहे.

गृहमंत्री नरोत्तम दास मिश्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तिची मानसिकता टुकडे टुकडे टोळीची आहे, त्यामुळेच ती लष्कराच्या विरोधात काहीही बोलत आहे.

पुढे नरोत्तम दास म्हणाले की, ऋचा चड्ढाच्या अशाप्रकारे बोलण्याने देशातील जनता दुखावली आहे. इतकेच नाही तर तिच्याविरोधात तक्रार आल्यास एफआयआर नोंदवून तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

श्रद्धाच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे करण्यात आले पण त्यावेळी ही ऋचा चड्ढा का बोलली नाही? असेही नरोत्तम दास म्हणाले आहेत. सतत ऋचा चड्ढा विरोधात संताप वाढताना दिसतोय.

प्रकाश राज यांनी मात्र ऋचा चड्ढाच्या विधानाचे समर्थ केले असून तिच्यासाठी ते मैदानात देखील उतरले आहेत. अक्षय कुमारने ऋचा चड्ढाला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खडेबोल सुनावले आहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI