Raj Kundra Case | ‘राज काय करायचा हे मी विचारलेच नाही…’, अश्लील चित्रपट प्रकरणात शिल्पा शेट्टीने नोंदवला जबाब!

राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लील चित्रपट प्रकरणात 23 जुलै रोजी मुंबई गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) जबाब नोंदवला होता. शिल्पा शेट्टीने पोलिसांना दिलेल्या जबाबाचा तपशील समोर आला आहे.

Raj Kundra Case | ‘राज काय करायचा हे मी विचारलेच नाही...’, अश्लील चित्रपट प्रकरणात शिल्पा शेट्टीने नोंदवला जबाब!
शिल्पा शेट्टीला कोर्टाकडून दिलासा मिळणार
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 5:35 PM

मुंबई : राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लील चित्रपट प्रकरणात 23 जुलै रोजी मुंबई गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) जबाब नोंदवला होता. शिल्पा शेट्टीने पोलिसांना दिलेल्या जबाबाचा तपशील समोर आला आहे. आपल्या जबाबात अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणाली की, तिने राज कुंद्राला त्याच्या कामाबद्दल कधीच काही विचारले नाही. ती स्वतः तिच्या कामात व्यस्त होती. हॉटशॉट अॅपबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे शिल्पा म्हणाली. राज कुंद्रा सध्या तुरुंगात आहे.

शिल्पा शेट्टीने पोलिसांना सांगितले की, राज कुंद्रा 2019 मध्ये आर्म्सप्राईम मीडिया कंपनीत सामील झाला होता. सौरव कुशवाह त्याचे साथीदार होते. ही कंपनी पूनम पांडे सारख्या अभिनेत्रींचे छोटे व्हिडीओ बनवायची, ज्यामध्ये अभिनेत्री एक्स्पोज करायच्या. हे सर्व त्यांच्या इच्छेनुसार केले गेले होते. मी राजला त्याबद्दल विचारले, तेव्हा  तो म्हणाला की, हा ओटीटी प्लॅटफॉर्म चांगले काम करत आहे आणि त्याला त्यातून चांगला नफा मिळत आहे. यानंतर राज काही कारणांमुळे सौरव कुशवाह पासून वेगळा झाला.

राज कुंद्राच्या बॉलीफेम अॅप बद्दल काहीच माहिती नाही!

शिल्पा शेट्टीने सांगितले की, आरोपी उमेश कामथ हा तिची कंपनी वियान इंडस्ट्रीजमध्ये काम करत असल्याचे तिला माहीत होते. फेब्रुवारीमध्ये जेव्हा त्याला अटक करण्यात आली, तेव्हा शिल्पाने राज कुंद्राला याबद्दल विचारले होते. राजने नंतर शिल्पा शेट्टीला सांगितले की, कामथ हा गेहना वशिष्ठसोबत वेगळे काम करतो आणि अश्लील व्हिडीओ तयार करतो आणि विकतो. म्हणूनच त्याला अटक झाली आहे. शिल्पाने आपल्या जबाबात सांगितले होते की, तिला बॉलीफेम या अॅप बद्दल काहीच माहिती नाही.

मी त्याला कधीच विचारले नाही!

शिल्पा म्हणाली की, मला आता समजले आहे की हॉटशॉट अॅप वियान इंडस्ट्रीजच्या माध्यमातून तयार केले गेले आणि त्यात अश्लील व्हिडीओ बनवले गेले. त्यानंतर हे व्हिडीओ प्रदीप बक्षी यांची कंपनी केनरीनला विकले गेले. मी माझ्या कामात खूप व्यस्त होते आणि मी माझ्या पतीला कधीच विचारले नाही की, तो काय करतो आहे. शिवाय त्यानेही मला त्याच्या कामाबद्दल काहीही सांगितले नाही. मला याबद्दल काहीच माहिती नव्हती.

1500 पानांचे आरोपपत्र

अश्लील चित्रपट बनवून ते अॅपद्वारे प्रसिद्ध केल्याबद्दल मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राविरोधात (Raj Kundra) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. 1500 पानांचे हे पुरवणी आरोपपत्र 5 सप्टेंबर, बुधवार रोजी एस्प्लेनेड न्यायालयात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि या प्रकरणातील इतर आरोपींच्या विरोधात सादर करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणी राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता साक्षीदार बनणार आहे.

आतापर्यंतचे अपडेट असे आहेत की, राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि ते अॅपमध्ये डाऊनलोड आणि रिलीज केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. तो 19 जुलै 2021 पासून तुरुंगात आहे. त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आता 16 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 8 सप्टेंबर रोजी राज कुंद्राच्या वकिलांनी पुढील तारखेला न्यायालयात अपील केले. न्यायालयाने त्यांचे अपील स्वीकारले आणि पुढील सुनावणीची तारीख 16 सप्टेंबर निश्चित केली.

शिल्पा शेट्टी बनणार साक्षीदार

राज कुंद्राच्या अश्लील चित्रपट प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या हाती असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने एक तपास पथक तयार केले होते. ACP स्तरीय अधिकारी या संघाचे नेतृत्व करत आहे. ही टीम त्याच्या तपासाशी संबंधित माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवत आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या 11 आरोपींविरोधात आतापर्यंत तपास सुरू आहे, त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणात इतर कोणाचा सहभाग असल्याची माहिती नाही. तसेच, आता शिल्पा शेट्टी या प्रकारणात साक्षीदार होणार आहे.

हेही वाचा :

Aamna sharif : अभिनेत्री आमना शरीफचा कातिलाना अंदाज, पाहा खास फोटो

Money Laundering Case | मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिसची पुन्हा चौकशी होणार, नोरा फतेहीला देखील ईडीचा बुलावा!

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....