AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imraan Khan : बायकोला सोडलं, मेंटल हेल्थ बिघडली, करिअर बर्बाद… कोण आहे इमरान खान? अमिर खानशी खास कनेक्शन

अभिनेता इमरान खान पुन्हा चर्चेत आहे. आमिर खानचा भाचा असलेल्या इमरानने मानसिक आरोग्याच्या समस्या, पत्नी अवंतिका मलिकसोबतचा घटस्फोट आणि करिअरच्या चढ-उतारांवर नुकतेच भाष्य केले. अमेरिकेच्या नागरिकत्वामुळे त्याला देश सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर त्याचे भूतकाळातील संघर्ष पुन्हा समोर आले आहेत, ज्यातून तो आता सावरत आहे.

Imraan Khan : बायकोला सोडलं, मेंटल हेल्थ बिघडली, करिअर बर्बाद... कोण आहे इमरान खान? अमिर खानशी खास कनेक्शन
Imran KhanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 11:06 AM
Share

अभिनेता इमरान खान याला सीजेपीच्या आंदोलनात भाग घेणं चांगलंच भोवलं आहे. इमरान खान हा अमेरिकन नागरिक असल्याने त्याला देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी नोटीस बजावून इमरानला हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे इमरान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इमरान खान नेमका कोण आहे? तो काय करतो? याचा घेतलेला हा मागोवा.

इमरान खान हा अभिनेता आमिर खानचा भाचा आहे. इमरान सध्या अमेरिकेत राहतो. तो अमेरिकेचा नागरिक आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळांमुळे तो नैराश्यात गेला होता. पत्नी अवंतिका मलिकसोबतचा त्याचा ताळमेळ व्यवस्थित नव्हता. दोघंही नात्यात खूश नव्हते. नात्यात सौहार्द नसल्याने तो डिप्रेशमध्ये गेला होता. त्यामुळे त्याने अवंतिकाला तलाक दिला. या काळात तो सिनेमापासूनही दूर होता. त्यामुळे त्याचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. त्याचं करिअर बर्बाद झालं. इमरान हा सिंगल पॅरंट आहे. त्याच्या मुलीची देखभाल तो एकटाच करतो. त्याने मुलीसाठी घरी आया ठेवली नाही. तो स्वत: मुलीचा टिफिन बनवतो. तिला शाळेत नेऊन सोडतो आणि शाळेतून घेऊन येतो. त्याने एका मुलाखतीत अवंतिकाशी झालेला तलाक आणि त्याच्या मेंटल हेल्थवर भाष्य केलं होतं.

सध्या मेंटली फिट

इमरान खान सध्या मेंटली फिट आहे. तसेच डिप्रेशनच्या फेजमधूनही बाहेर पडला आहे. त्यावर त्याने मनमोकळं भाष्य केलं होतं. लोकांनीही या फेजमधून जावू नये म्हणून तो भडाभडा बोलला होता. माझ्यासोबत काही तरी गडबड होतेय याची जाणीव मला 2016मध्ये पहिल्यांदाच झाली. त्यावेळी माझा तलाक झालेला नव्हता. मी आधी होतो तसा आहे असं मला वाटत नव्हतं. मी सर्वांशी बोलत होतो. पण आतून खच्चून गेलो होतो. मनात नैराश्य दाटून आलं होतं. माझ्या इमेजच्या विरोधात मी वागत होतो. मी जो आहे, तो नसून दुसरीच इमेज घेऊन वावरत असल्याचं मला वाटत होतं. त्यामुळेच मला ही इमेज बदलायची होती, असं त्याने सांगितलं होतं.

नात्यातून बाहेर पडणं…

मी 2016मध्ये माझ्या मेंटल हेल्थवर काम करायला सुरुवात केली. हे माझ्या आयुष्याचं ध्येयचं मी बनवलं. माझ्या बायकोसोबतचं माझं नातं अनहेल्दी असल्याचं मला जाणवलं. फारच कमी वयात आमचं नातं सुरू झालं होतं. नात्यात काय चांगलं असतं आणि काय नाही हे समजण्या एवढा आमच्याकडे तेवढा अनुभव नव्हता. मला जेव्हा थोडं कळू लागलं तेव्हा आम्ही एका भयंकर चक्रात अडकल्याची जाणीव झाली. हे चक्र आपण भेदू शकत नाही, हे सुद्धा कळून चुकलं. त्यामुळे त्यातून बाहेर पडणं आणि बदल करणं आमच्यासाठी आवश्यक होतं. पण आम्ही असं करत नव्हतो. आमचं अनहेल्दी आयुष्य जगणं सुरू होतं. त्यामुळेच हेल्दी आयुष्य जगण्यासाठी नात्यातूनच बाहेर पडण्याची गरज असल्याचं मला जाणवलं, असं तो म्हणाला.

वैवाहिक आयुष्य वाईट

इमरानने जेव्हा पत्नी अवंतिका मलिकला तलाक दिला तेव्हा त्याची मेंटल हेल्थ बिघडली असून तो डिप्रेशनमध्ये गेल्याचं बोललं जात होतं. बायकोपासून वेगळं होण्याचा निर्णय हा सेल्फ हिलिंगसाठी होता. मेंटल हेल्थच्या कारणाने हा निर्णय घेतला नव्हता. मी कुणालाच दोष देत नाही. मी लोकांपासून दूर राहिलो. माझ्या पाठीमागे अफवा, गॉसिप करण्यात आले. तलाक झाल्याने माझी हालत बिघडली असं लोक समजू लागले. माझ्या वैवाहिक आयुष्यातील शेवटचे काही दिवस अत्यंत वाईट होते. हे वाईट दिवस संपवण्याचा निर्णय मी घेतला, असं इमरानने सांगितलं होतं.

बायकोपासून वेगळं होण्याचा निर्णय माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. माझी तब्येत ठिक होण्यासाठी मला एक संधी मिळाली. आमच्या दोघांमध्ये मेळ नव्हता. आम्ही एकमेकांना बेस्ट बनण्यासाठी मदत करत नव्हतो. वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याने प्रचंड वेदना झाल्याच. पण अनहेल्दी वातावरण राहण्यापेक्षा वेगळं होणच उत्तम पर्याय होता, असंही त्याने म्हटलं होतं.

Follow Us
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन