Birthday Special | वाढदिवसाच्या पोस्टमध्ये स्वतःच वय सांगतानाच चुकले ‘बिग बी’, लेक श्वेताने सावरली बाजू…  

बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज (11 ऑक्टोबर) आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी प्रयागराजमध्ये झाला.

Birthday Special | वाढदिवसाच्या पोस्टमध्ये स्वतःच वय सांगतानाच चुकले ‘बिग बी’, लेक श्वेताने सावरली बाजू...  
Amitabh Bachchan

मुंबई : बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज (11 ऑक्टोबर) आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी प्रयागराजमध्ये झाला. दरवर्षी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. दरवर्षी त्यांचे घर ‘जलसा’ बाहेर चाहते जमतात. बिग बींनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे, पण त्यात त्यांनी चूक केली आहे.

बिग बींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये अमिताभ बच्चन चालत असताना कुठेतरी जात आहेत. फोटोमध्ये ते राखाडी जॅकेट, ट्राउजर आणि स्लिंग बॅग घेऊन जाताना दिसत आहे. फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, मी 80व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे.

पाहा पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

मुलगी श्वेताने सांगितले योग्य वय

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर त्यांची मुलगी श्वेता यांनी लगेच कमेंट केली आहे. तिने वडिलांना त्यांचे अचूक वय- 79 लिहून लिहिले, यासोबतच त्यांनी एक इमोजी पोस्ट केला.

बॉलिवूड सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते आणि बॉलिवूड सेलेब्स कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी टिप्पणी करत लिहिले की, स्वॅग.. वाढदिवसाच्या शुभेच्छा सर. तर रणवीर सिंहने लिहिले की, ‘गँगस्टर’. 8 लाखांहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे.

चाहत्यांचे मानले आभार

अमिताभ बच्चन यांनी रविवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये त्यांचे हितचिंतक आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. तुम्हा सर्वांना वैयक्तिक उत्तर देणे कठीण आहे, पण मला माहित आहे की तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे तुम्हाला समजले आहे आणि हे महत्त्वाचे आहे. मी तुम्ही आणि तुमच्या प्रेमामुळे भरवून गेलो आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सध्या बिग बी क्विझ रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती 13 मध्ये दिसत आहेत. ते स्पर्धकांसोबत शोमध्ये खूप धमाल करताना दिसत आहे. बिग बींच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ते शेवट इम्रान हाश्मी आणि रिया चक्रवर्तीसोबत ‘चेहरे’ या चित्रपटात दिसले होते. त्यांचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक चित्रपट आहेत. ते ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’ आणि ‘मेडे’ मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Amitabh Bachchan | कठीण काळात मेहमूद यांनी अमिताभ बच्चनला दिली साथ, ‘या’ कारणामुळे नात्यात आला दुरावा!

Happy Birthday Amitabh Bachchan | फ्लॉप स्टार बनला बॉलिवूडचा ‘महानायक’, प्रकाश मेहरांमुळे चमकले होते अमिताभ बच्चन यांच्या नशिबाचे तारे!

Girija Oak Godbole: गिरीजा ओकचा नवरात्रीतील ‘रंग माझा वेगळा…’ ब्लॅक साडीतील हा प्रसन्न मूड पाहाच!

Subodh Bhave : ‘मला नेहमी वाटायचं की सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे’, अभिनेते सुबोध भावे यांची पेट्रोल डिझेल दरवाढीवरून खोचक पोस्ट…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI