AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Amitabh Bachchan | फ्लॉप स्टार बनला बॉलिवूडचा ‘महानायक’, प्रकाश मेहरांमुळे चमकले होते अमिताभ बच्चन यांच्या नशिबाचे तारे!

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे आज बॉलिवूडमधील सर्वोत्तम स्टार्सपैकी एक मानले जातात. आज (11 ऑक्टोबर) महानायक अमिताभ बच्चन 79 वर्षांचे झाले आहेत. अभिनेत्याचा इथपर्यंतचा प्रवास आव्हानांनी भरलेला होता.

Happy Birthday Amitabh Bachchan | फ्लॉप स्टार बनला बॉलिवूडचा ‘महानायक’, प्रकाश मेहरांमुळे चमकले होते अमिताभ बच्चन यांच्या नशिबाचे तारे!
Amitabh Bachchan
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 7:46 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे आज बॉलिवूडमधील सर्वोत्तम स्टार्सपैकी एक मानले जातात. आज (11 ऑक्टोबर) महानायक अमिताभ बच्चन 79 वर्षांचे झाले आहेत. अभिनेत्याचा इथपर्यंतचा प्रवास आव्हानांनी भरलेला होता. पण ते म्हणता ना की, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी व्यक्ती नक्कीच असते, जी त्यांना त्यांच्या खऱ्या गंतव्यापर्यंत पोहचण्यास मदत करते. तशीच, अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात प्रकाश मेहरा ही व्यक्ती होती. होय, एक काळ होता जेव्हा अमिताभ बच्चन यांनी सलग 10 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर मुंबईहून अलाहाबादला परतण्याची तयारी केली होती.

अमिताभ बच्चन यांनी 70च्या दशकात बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्या काळात त्यांना प्रत्येक चित्रपटातून नाकारले जात होते. त्यांची लांबी आणि जड आवाजामुळे, बहुतेक निर्माते-दिग्दर्शकांनी त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये कास्ट करणे पसंत करत नव्हते. त्याकाळात आजच्यासारखे कास्टिंग डायरेक्टर नव्हते. प्रत्येक नायकाला स्वतः जाऊन काम मागावे लागत असे.

अमिताभ बच्चन यांचा संघर्ष

अमिताभ बच्चन त्यावेळी प्रचंड संघर्ष करत होते. त्यांचे काही डेब्यू चित्रपट बॉक्स ऑफिसवर आले होते, ज्यात ‘शेरा’, ‘प्यार की कहानी’, ‘रास्ते का पत्थर’ यासोबतच त्यांचे ‘आनंद’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ हे दोन मोठे चित्रपटही रिलीज झाले, पण अमिताभ यांना या चित्रपटांचा फायदा झाला नाही.

दरम्यान, अमिताभ अस्वस्थ होते, हळूहळू त्यांना कळू लागले की, त्यांची कारकीर्द कोणत्याही टोकाला जाणार नाही. त्यावेळी प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात प्रवेश केला. प्रकाश यांचा सुरुवातीपासूनच मसाला आणि मनोरंजनाने भरलेले चित्रपट बनवण्यावर विश्वास होता. पण त्या काळात राजेश खन्ना यांची लाट चालू होती. जिथे प्रत्येकजण त्याच्या रोमँटिक चित्रपटांसाठी वेडा होता. पण प्रकाश यांची कल्पना देखील अद्वितीय होती.

मनात चित्रपट तयार असायचा!

अनेक ठिकाणी असे लिहिले गेले आहे की प्रकाश हे एक महान दिग्दर्शक होते ज्यांनी कधीही चित्रपटाची स्क्रिप्ट हातात ठेवली नाही. त्याच्या मनात चित्रपट नेहमीच तयार असायचे. प्रकाश मेहरा यांना एक सवय होती, ते त्यांच्यासोबत सेटवर उपस्थित कलाकारांवर विश्वास ठेवायचे. ज्यामुळे ते त्यांना अभिनयाचे पूर्ण स्वातंत्र्य देत असे. ज्यामुळे त्याच्या चित्रपटांची पात्रं अतिशय मजबूत शैलीत दिसली. अमिताभ बच्चनसोबत त्यांनी ‘जंजीर’, ‘मुकद्दर का सिकंदर’ असे काही चित्रपट केले होते.

अमिताभ यांनी ‘जंजीर’ स्वीकारला अन्….

अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’ चित्रपटाची कथाही अप्रतिम आहे, प्रकाश मेहरा या चित्रपटासाठी मोठा चेहरा शोधत होते. त्यांनी त्या काळात अनेक मोठ्या स्टार्सना या चित्रपटाची कथा सांगितली, पण राजेश खन्नांच्या या युगात सर्वांना फक्त रोमँटिक चित्रपटांमध्ये काम करायचे होते. प्रकाशही या कथेवर ठाम होते, हा चित्रपट धर्मेंद्र, राजकुमारपासून देव आनंदपर्यंतच्या अनेक स्टार्सनी नाकारला होता. त्यावेळी प्रकाश यांना वाटले की, हा चित्रपट आता कोल्ड स्टोरेजमध्ये जाईल. त्याचवेळी या चित्रपटाचे लेखक सलीम-जावेद यांनी प्रकाश यांच्या समोर अमिताभ बच्चन यांचे नाव ठेवले होते आणि प्रकाश यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपट पाहिला होता. त्यांनाही अमिताभ यांचा अभिनय आवडला होता. यानंतर अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट साईन केला आणि पुढे त्यांनी या चित्रपटाद्वारे एक इतिहासच तयार केला.

हेही वाचा :

‘Squid Game’ तब्बल 10 वर्ष करावा लागला होता नकाराचा सामना, आता ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय सीरीज!

आर्यनच्या अटकेमुळे शाहरुख खानला कोट्यवधींचा फटका, ‘या’ ब्रँडने तोडला व्यावसायिक करार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.