AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jackie Shroff: इंटिमेट सीन देताना जॅकी श्रॉफला अवघडल्यासारखं का होतं?, म्हणाले- बरेच लोक तुम्हाला बघत असतात!

जॅकी श्रॉफ यांनी इंटिमेट सीन्स शूट करण्याविषयी सांगितलं. ते म्हणालेत - मला खूप लाज वाटत होती. जेव्हा मी असे सीन करतो, तेव्हा मी अस्वस्थ होतो. मी हे करतोय कारण मी एक अभिनेता आहे. (Jackie Shroff: Why did Jackie Shroff find it difficult to give intimate scenes ?, he said- a lot of people are watching you!)

Jackie Shroff: इंटिमेट सीन देताना जॅकी श्रॉफला अवघडल्यासारखं का होतं?, म्हणाले- बरेच लोक तुम्हाला बघत असतात!
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 7:42 AM
Share

मुंबई :अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांचा ‘द इंटरव्यू: नाईट ऑफ 26/11’ (The Interview Night Of 26/11) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॅकी इंटिमेट सीन करताना दिसणार आहेत. याबद्दल सांगताना ते म्हणालेत की इंटीमेट सीन शूट करताना त्यांना खूप लाज वाटली पण जर भूमिकेला याची गरज आहे तर ते करावं लागतं कारण ते एका अभिनेत्याच्या कामाचा भाग आहे.

बॉलिवूड हंगामाशी खास बातचीत करताना जॅकी श्रॉफ यांनी इंटिमेट सीन्स शूट करण्याविषयी सांगितलं. ते म्हणालेत – मला खूप लाज वाटत होती. जेव्हा मी असे सीन करतो, तेव्हा मी अस्वस्थ होतो. मी हे करतोय कारण मी एक अभिनेता आहे.

भूमिकेच्या मागणीनुसार काही गोष्टी कराव्या लागतात

जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले की, अनेक लोक कॅमेऱ्यावर तुमच्याकडे बघत असतात. दिग्दर्शक, सहाय्यक, क्रू आणि संपूर्ण जग बघत असतं. हे खूप लाजिरवाणं वाटतं पण तुम्हाला ते करावं लागतं कारण ते तुमचे काम आहे. जर भूमिकेला गरज असेल तर ते तुम्हाला करावंच लागेल.

जॅकी श्रॉफ हे ‘द इंटरव्यू: नाईट ऑफ 26/11’ या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. ज्यामध्ये त्या एका बॉलिवूड स्टारची मुलाखत घेण्यास सांगितलं जातं. हा डच चित्रपट द इंटरव्ह्यूचा रिमेक आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर जॅकी श्रॉफ शेवटी राधे चित्रपटात सलमान खान, दिशा पटानी आणि रणदीप हुड्डासोबत दिसले होते. या चित्रपटात ते एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होते. त्यापूर्वी ते हॅलो चार्लीमध्ये दिसले होते. जॅकी श्रॉफनं डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. ते ओके कॉम्प्युटर या वेब सीरिजमध्ये दिसले होते.

जॅकी लवकरच रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहेत. चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज होणार होता मात्र कोरोना महामारीमुळे तो पुढे ढकलण्यात आला. चित्रपटाची नवीन रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.

संबंधित बातम्या

Monalisa : निळासागर, निळाच गॉगल… भोजपुरी क्विन मोनालिसाच्या बोल्डनेसने केले क्लिनबोल्ड; पाहा फोटो

Nusrat Jahan Baby: बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँनं मुलाचं नाव ठेवलं ‘ईशान’, आज डिस्चार्जची शक्यता

Bigg Boss 15 New Promo : बिग बॉसचं घर झालं गायब, स्पर्धकांना आधी जंगल पार करावे लागणार?, पाहा व्हिडिओ

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.