AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nusrat Jahan Baby: बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँनं मुलाचं नाव ठेवलं ‘ईशान’, आज डिस्चार्जची शक्यता

तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहाँने तिच्या मुलाचं नाव ईशान ठेवलं आहे. (Nusrat Jahan Baby: Bengali actress Nusrat Jahan named her child 'Yishaan', likely to be discharged today)

Nusrat Jahan Baby: बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँनं मुलाचं नाव ठेवलं 'ईशान', आज डिस्चार्जची शक्यता
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 6:53 PM
Share

मुंबई : बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहाँने (Nusrat Jahan baby Boy) तिच्या मुलाचं नाव ईशान (Yishaan) ठेवलं आहे. गुरुवारी, नुसरत जहाँनं पार्क स्ट्रीट येथील एका खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुसरत जहाँला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो.

नुसरत जहाँ पतीसोबत विभक्त झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. नुसरत जहाँनं त्यांचे लग्न कायदेशीर अमान्य आहे असं म्हटलं होतं. ती लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिचा पती निखिल जैननंही तो मुलाचा बाप नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मुलाच्या जन्मानंतर, वडिलांच्या नावाबद्दल सतत प्रश्न असतात. वडिलांच्या नावाबाबत नुसरत जहाँला सतत सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

मुलाचं नाव अभिनेता यश दासगुप्ताच्या नावाशी जुळतं का?

नुसरतनं तिच्या मुलाचं नाव ‘ईशान’ ठेवलं आहे, ज्याचं इंग्रजी स्पेलिंग ‘Yishaan’ आहे. चित्रपट अभिनेता यश दासगुप्ताच्या नावाशी हे नाव जुळतं का? तर प्रश्न असा निर्माण होत आहे की अभिनेता यश दासगुप्ता या मुलाचे वडील आहेत? मुलाच्या जन्मानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अभिनंदन केलं आहे. ईशानच्या जन्मानंतर लगेचच अभिनेत्री आणि टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती आणि अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी यांनीही तिचं अभिनंदन केलं. यश दासगुप्ता गर्भधारणादरम्यान नुसरतसोबत सर्व वेळ दिसत होता. त्याच्या सोशल पोस्टवरून अनेक सूचनाही मिळाल्या आहेत. नुसरत आणि यश काही दिवसांपूर्वी एकत्र दिसले होते, जेव्हा ते पार्क स्ट्रीटवरील एका प्रसिद्ध बेकरीमध्ये जेवायला गेले होते. नुसरत याच दिवशी पहिल्यांदा ‘बेबी बम्प’ सोबत सार्वजनिकरित्या दिसली होती.

रुग्णालयात दाखल करण्यासाठी यश दासगुप्ता

प्रसूतीच्या वेळी यश दासगुप्ता संपूर्ण वेळ नुसरत यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होता. नुसरत यश दासगुप्तासोबत हॉस्पिटलमध्ये गेली. मुलाच्या जन्मानंतर, यश दासगुप्त यांनी सर्वप्रथम नुसरत आणि नवजात सुखरूप असल्याचं सांगितलं. या सगळ्या दरम्यान, निखिल जैन यांनी नुसरतचं अभिनंदन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यानं सांगितलं आहे की तो मुलाला भेटायला जाणार नाही, पण नुसरतच्या ‘लिव्ह इन हसबँड’ने ईशानच्या आरोग्याची शुभेच्छा दिली.

सिंगल पॅरेंट म्हणून करणार लेकाचा सांभाळ 

नुसरत जहाँनं वर्ष 2019 मध्ये बिझनेसमन निखिल जैन यांच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. हा विवाह तुर्कीमध्ये झाला होता. यानंतर, दोघांनी कोलकात्यात एक भव्य रिसेप्शन दिलं होतं, ज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह बंगाली चित्रपट उद्योगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र, हे लग्न फार काळ टिकलं नाही. या वर्षी जून महिन्यात नुसरत आणि बंगाली अभिनेता यश दासगुप्ताच्या नात्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या, त्यानंतर नुसरतनं 2020 मध्ये निखिल जैनपासून विभक्त झाल्याचा खुलासा केला होता. तुर्कीच्या कायद्यानुसार तिचं आणि निखिलचे लग्न होतं आणि ते भारतात वैध नाही असं ती म्हणाली होती. दरम्यान, जेव्हा नुसरत जहाँच्या गरोदरपणाची बातमी समोर आली तेव्हा निखिल जैन यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केले. निखिलनं या गर्भधारणेपासून दूर राहून नुसरतबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या लग्नातील वादादरम्यान, जैन यांनी एका निवेदनात म्हटलं होतं की, तो आणि नुसरत जहाँ नोव्हेंबर 2020 मध्ये विभक्त झाले होते आणि त्यांनी विवाह रद्द करण्यासाठी अर्जही दाखल केला होता. त्यामुळे आता ती सिंगल पॅरेंट म्हणून बाळाचा सांभाळ करणार का असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहे.

संबंधित बातम्या

Bigg Boss 15 New Promo : बिग बॉसचं घर झालं गायब, स्पर्धकांना आधी जंगल पार करावे लागणार?, पाहा व्हिडिओ

Surbhi Chandana : टीव्हीची हॉट ‘नागिन’; सुरभी चंदनाचा ग्लॅमरस अवतार पाहिलात?

Birthday Special : आधी वडिलांच्या मित्राच्या मुलीशी लग्न; नंतर नागार्जुनच्या आयुष्यात अमलाची एन्ट्री, वाचा काही खास गोष्टी

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.