AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिससह या प्रसिद्ध फॅशन डिझायनरची होणार चौकशी, वाचा संपूर्ण प्रकरण…

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलिन फर्नांडिसला आज चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, यावेळी जॅकलिनसोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर लीपाक्षी देखील असणार आहे. जॅकलिन फर्नांडिस आणि लीपाक्षी यांची समोरासमोर चौकशी केली जाऊ शकते.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिससह या प्रसिद्ध फॅशन डिझायनरची होणार चौकशी, वाचा संपूर्ण प्रकरण...
| Updated on: Sep 19, 2022 | 10:02 AM
Share

मुंबई : ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे पाय खोलात असल्याचे आता स्पष्टच झाले आहे. इतकेच नव्हे तर सुकेश चंद्रशेखरच्या प्रेमात जॅकलिन इतकी आंधळी झाली होती की, तिला सुकेश चंद्रशेखरसोबत लग्नही करायचे होते. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी दररोज वेगवेगळे खुलासे पुढे येत असून फक्त जॅकलिन फर्नांडिसच (Jacqueline Fernandez) नव्हे तर बॉलिवूडमधील 5 प्रसिध्द अभिनेत्री देखील सुकेशच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी जॅकलिनला आज 19 सप्टेंबर रोजी तिसऱ्यांना दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी (Inquiry) बोलावले आहे. सकाळी 11 वाजता जॅकलिनला कार्यालयात चौकशीसाठी पोहचावे लागणार आहे.

जॅकलिन फर्नांडिसची तिसऱ्यांदा होणार चाैकशी

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलिन फर्नांडिसला आज चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, यावेळी जॅकलिनसोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर लीपाक्षी देखील असणार आहे. जॅकलिन फर्नांडिस आणि लीपाक्षी यांची समोरासमोर चौकशी केली जाऊ शकते, अशी महत्वाची माहिती मिळत आहे. डिझायनर लिपाक्षीलाही पोलिसांनी समन्स बजावले आहे. सध्याची परिस्थिती बघितल्यावर जवळपास हे स्पष्टच आहे की, पुढील काही दिवसांमध्ये जॅकलिन फर्नांडिसच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होणार.

जॅकलिनसोबत या प्रसिद्ध फॅशन डिझायनरची होणार चाैकशी

रिपोर्टनुसार, जॅकलीनची ओळख सुकेश चंद्रशेखरशी पिंकी इराणीने केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलीन आणि पिंकी इराणीची समोरासमोर चाैकशी केली. या चाैकशी दरम्यान दोघींनी एकमेकींवर जोरदार आरोप केल्याची माहिती आहे. या सर्व प्रकरणी नोरा फतेहीला चाैकशीसाठी बोलवण्यात आले होते. सुकेशने नोरालाही महागडे गिफ्ट दिल्याची माहिती उघड झाल्याने नोराही या प्रकरणात अडकलीये.

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?