Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिससाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा, कोर्टात काय होणार?

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव आल्याने तिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. सुकेशने अत्यंत महागडे गिफ्ट हे जॅकलिनला दिले आहेत.

Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिससाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा, कोर्टात काय होणार?
| Updated on: Oct 22, 2022 | 12:32 PM

मुंबई : सुकेश चंद्रशेखर खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे (Jacqueline Fernandez) नाव आल्याने चाहत्यांना मोठा धक्काच बसला. यानंतर बॉलिवूडमधील (Bollywood) जॅकलिनचे जवळचे मित्र देखील तिच्यापासून दूर गेले. सलमान खान आणि जॅकलिनच्या नात्यामध्ये देखील दुरावा आलाय. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) प्रकरणात पोलिस जॅकलिनची सतत चाैकशी करत आहेत. जॅकलिनला गेल्या महिन्यात अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. आज जॅकलिनच्या जामीन याचिकेवर सुनावणीसाठी होणार आहे.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव आल्याने तिच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. सुकेशने अत्यंत महागडे गिफ्ट हे जॅकलिनला दिले आहेत. मात्र, या गिफ्टसाठी सुकेशकडे कुठून पैसे यायचे हे मला अजिबात माहिती नव्हते किंवा याची मला मुळीच कल्पना नव्हती असे यापूर्वी जॅकलिनने सांगितले आहे.

सुकेश चंद्रशेखरच्या प्रेमात जॅकलिन इतकी बुडाली होती की, तिला सुकेशसोबत लग्न देखील करायचे होते. सुकेश चंद्रशेखरने फक्त जॅकलिनलाच नाही तर नोरा फतेहीला देखील महागडे गिफ्ट दिले होते. बिग बाॅस फेम निक्की तांबोळी देखील सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी दिल्लीच्या जेलमध्ये गेले होती.

जॅकलिन सुरूवातीपासूनच सांगत आहे की, सुकेश चंद्रशेखरच्या खंडणी प्रकरणात माझे काहीच देणे घेणे नाही, माझा यामध्ये अजिबात सहभाग नाहीये. जॅकलिनने न्यायालयात तिचा पासपोर्ट परत करण्याची विनंती केलीये. आता यावर सुनावणी होणार आहे. बाॅलिवूडमधील अनेक कलाकार सुकेशच्या प्रकरणात जॅकलिनचे नाव आल्यापासून दूर राहत आहेत.