AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi Kapoor | बॉयफ्रेंडसोबत फॅमिली फंक्शनमध्ये जाताना जान्हवी कपूर स्पॉट, कॅमेरा बघताच…

विशेष म्हणजे या पार्टीमध्ये अर्जुन कपूर हा देखील मलायका अरोरा हिच्यासोबत पोहचला होता.

Janhvi Kapoor | बॉयफ्रेंडसोबत फॅमिली फंक्शनमध्ये जाताना जान्हवी कपूर स्पॉट, कॅमेरा बघताच...
| Updated on: Jan 05, 2023 | 3:37 PM
Share

मुंबई : जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर जान्हवी कपूर हिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. रिया कपूर हिच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कपूर फॅमिली जमली होती. या पार्टीला जान्हवी कपूर हिने देखील हजेरी लावली. मात्र, या पार्टीमध्ये जान्हवी तिच्या मिस्ट्री मॅनसोबत दिसून आली. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये अर्जुन कपूर हा देखील मलायका अरोरा हिच्यासोबत पोहचला होता. पार्टीमध्ये जात असतानाचा जान्हवी कपूर आणि तिच्या मिस्ट्री मॅनचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. कॅमेरा दिसताच जान्हवी कपूर हिने तोंड लपवण्यास सुरूवात केली.

जान्हवी कपूरच्या मिस्ट्री मॅनचे नाव शिखर पहाडिया आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहेत. यामध्येच आता हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

शिखर पहाडिया याच्याबरोबर अनेकदा जान्हवी स्पाॅट होते. मात्र, आता तर फॅमिली पार्टीमध्येच जान्हवी ही शिखर पहाडियासोबत पोहचलीये. बोनी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्यामध्ये देखील एक खास रिलेशन असल्याचे सांगितले जाते.

काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, जान्हवीचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. मिली या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनीच केली होती. परंतू या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

2023 मध्ये जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर ही देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यंदाचे वर्ष हे स्टारकिड्ससाठी खास ठरणार आहे. कारण या वर्षात तब्बल सात स्टारकिड्स हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

जान्हवीचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहता हे स्पष्ट होत आहे की, जान्हवी आणि शिखर पहाडिया हे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, अजूनही जान्हवी किंवा शिखर यांनी आपल्या रिलेशनवर काही भाष्य केले नाहीये.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...