AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकास मानकतला याने बेघर झाल्यानंतर अर्चना गाैतम हिला सुनावले खडेबोल

विकास मानकतला याने घरामध्ये गेल्यावर शिव ठाकरे यालाच टार्गेट करण्यास सुरूवात केले होती.

विकास मानकतला याने बेघर झाल्यानंतर अर्चना गाैतम हिला सुनावले खडेबोल
| Updated on: Jan 04, 2023 | 10:54 PM
Share

मुंबई : विकास मानकतला हा बिग बाॅसच्या घराबाहेर पडला आहे. परंतू अजूनही विकास मानकतला याला विश्वास बसत नाहीये की, तो बिग बाॅसमधून बेघर झाला आहे. विकास मानकतला याची पत्नी गुंजन हिने देखील विकास मानकतला घराच्याबाहेर पडल्यानंतर शिव ठाकरे याच्यावर अनेक आरोप केले. परंतू शिव ठाकरेवर आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर विकासची पत्नी गुंजन हिलाच लोकांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली. विकास मानकतला याने घरामध्ये गेल्यावर शिव ठाकरे यालाच टार्गेट करण्यास सुरूवात केले होती.

विकास मानकतला हा नाॅमिनेशनमध्ये होता. कमी मत मिळाल्याने त्याला बिग बाॅसच्या घरातून बाहेर यावे लागले आहे. मी गेम चांगला खेळत असल्याने मी बाहेर आल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे विकास सतत सांगताना दिसतोय.

टीना दत्ता, शालिन भनोट, प्रियंका चाैधरी यांच्या ग्रुपमध्ये विकास सहभागी झाला होता. बिग बाॅसच्या घरात दाखल होताच विकास म्हणाला होता की, मी कोणात्याच ग्रुपचा सदस्य होणार नसून मी एकटाच गेम खेळणार आहे. परंतू प्रत्यक्षात विकासचा गेम तसा अजिबात दिसला नाही.

बिग बाॅसच्या घरात असताना अर्चना गाैतम आणि विकास यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली होती. यावेळी अर्चनाने म्हटले होते की, तू आयुष्यामध्ये कधीच बाप होऊ शकत नाही. यावर नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विकास याने मोठे विधान केले आहे.

विकास म्हणाला की, मुळात मी अर्चना हिला माझ्या पर्सनल लाईफबद्दल सांगून मोठी चूक केली. कारण तिने भांडणामध्ये तो विषय काढला. जेंव्हा अर्चना मला म्हणाली की, तू आयुष्यामध्ये कधीच बाप होऊ शकत नाही…त्यावेळी मी खूप जास्त भावनिक झालो होतो…

अर्चनासारख्या मुर्ख मुलीला मी हे सांगूनच चूक केली होती. यावरून हे कळते की, तिचे संगोपन कसे झाले आहे. अर्चना रिअल लाईफमध्येही कशाप्रकारची आहे हे यावरून स्पष्ट होते.

Follow Us
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक