Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धावर जावेद अख्तर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Mar 04, 2022 | 3:27 PM

पुणे : गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) जगभर अस्वस्थता आहे. या युद्धात अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. यात भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सर्वत्र याबाबत बोललं जातंय. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhatar) यांनीही रशिया युक्रेन युद्धावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज ते पुण्यात (Pune) बोलत होते. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये (Pune […]

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धावर जावेद अख्तर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जावेद अख्तर-रशिया युक्रेन युद्ध
Follow us on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) जगभर अस्वस्थता आहे. या युद्धात अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. यात भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सर्वत्र याबाबत बोललं जातंय. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhatar) यांनीही रशिया युक्रेन युद्धावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज ते पुण्यात (Pune) बोलत होते. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये (Pune International Film Festival) जावेद अख्तर यांनी विविध विषयांवर आपली मतं मांडली. यात रशिया युक्रेन युद्धाविषयी बोलताना ते म्हणाले, “जगाच्या पाठीवर कुठेही युद्ध होऊ नये. कारण युद्धात निष्पापांचा बळी जातो. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकल्याची माहिती आहे, मला विश्वास आहे की सगळे परत सुखरूप परत येतील”, असं जावेद अख्तर म्हणाले आहेत. याशिवाय विविध विषयांवर ते बोलते झाले.

सिनेमा बदलत चाललाय

“दिवसेंदिवस सिनेमा बदलत चाललाय. 1950 मध्ये ड्रायव्हर, कामगार यांच्यावर सिनेमे यायचे. नंतर नव्वदच्या दशकात हिरो काहीच काम करत नव्हता, तो स्वित्झर्लंडमध्येच दिसायचा. आमच्या पिढीतील लोक खूप खडतर आयुष्य जगले. यात जसे दिवस बदलत गेले तसं तसं सिनेमा बदलत गेला. आम्ही खूप कष्ट करून गाड्या, घर घेतलं पण पुढची पिढी यांना हे सगळं मिळालं. आजची तरुणाई बदलतेय आज तरुणाई मध्ये प्रगल्भता दिसतेय कारण ते भीम, काला या सारखे चित्रपट बघत आहेत. येणारी पिढी खूप चांगली आहे अशी आशा आहे”, असं जावेद अख्तर म्हणाले.

ओटीटी प्लॅटफॉर्म

“काही कथा 2 तासात संपत नाहीत. काही कथा बोल्ड आहेत, त्या याआधी सिनेमामध्ये दिसल्या नाहीत. ते सगळं ओटीटीवर आता दिसायला लागलंय.ओटीटीवर खूप चांगले सिनेमे आलेत. कल्पकतेचं खूप सुंदर आउटलेट म्हणजे ओटीटी”, असंही जावेद अख्तर म्हणाले.

सिंगल स्क्रीन सिनेमा

“प्रत्येक राज्याने फायनान्स न करता तो सिनेमा प्रदर्शित होतोय हे बघितलं पाहिजे.अमेरिकेत 1 लाख थिएटर्स आहेत. आपल्याकडे 14 हजार थिएटर आहेत. त्यामुळे मिनी थिएटर असतील असे छोटी चित्रपटगृहे सुरू केली पाहिजेत”, असं म्हणत जावेद अख्तरांनी नव्या सिनेमाघरांविषयी मत मांडलं.

संबंधित बातम्या

Madhuri Dixit Photo : माधुरी दीक्षितने शेअर केले खास फोटो, म्हणाली…

‘त्यापेक्षा बंद करा मालिका’; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ट्विस्टवर भडकले नेटकरी

Sai Lokur Photo : सई लोकुरचा ‘लॅव्हेंडर ब्लूम’, पाहा फोटो…