AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Death Anniversary | कधी काळी बस कंडक्टर म्हणून काम करायचे जॉनी वॉकर, ‘या’ दिग्दर्शकांनी दिला ब्रेक नि बनले सुपरस्टार!

अभिनेते जॉनी वॉकर (Johnny Walker) हिंदी चित्रपटसृष्टीचे असे एक स्टार होते, ज्यांना कोणीच कधीही विसरू शकत नाही. आपल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे जॉनीला चांगलेच माहित होते.

Death Anniversary | कधी काळी बस कंडक्टर म्हणून काम करायचे जॉनी वॉकर, ‘या’ दिग्दर्शकांनी दिला ब्रेक नि बनले सुपरस्टार!
जॉनी वॉकर
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 29, 2021 | 10:34 AM
Share

मुंबई : अभिनेते जॉनी वॉकर (Johnny Walker) हिंदी चित्रपटसृष्टीचे असे एक स्टार होते, ज्यांना कोणीच कधीही विसरू शकत नाही. आपल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे जॉनीला चांगलेच माहित होते. एक काळ असा होता की जॉनी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्यासाठी आपली नोकरीदेखील सोडली होती. जॉनीने आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मने जिंकली. जॉनी वॉकर यांनी 29 जुलै 2004 रोजी या जगाचा निरोप घेतला.

जॉनी हे मध्य प्रदेशातील एका मुस्लिम कुटुंबातून आले होते. त्यांचे खरे नाव बदरुद्दीन जमालउद्दीन काझी ऊर्फ जॉनी वॉकर असे होते. जॉनीला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईतील एका इन्स्पेक्टरच्या मदतीने कंडक्टरची नोकरी मिळवून दिली होती.

नोकरीची संधी

जेव्हा जॉनी यांना कंडक्टरची नोकरी मिळाली, तेव्हा त्यांनी आनंदाने हे काम स्वीकारले, कारण या बहाण्याने त्यांना मुंबईला जाण्यची संधी मिळणार होती. जॉनी कंडक्टरचे काम करत असताना अभिनेता बलराज साहनीशी त्यांची भेट झाली. ते जॉनीच्या स्टाईलने खूप खूष झाले आणि त्यांनी त्यांना गुरु दत्तला भेटायला सांगितले.

गुरु दत्तमुळे बदलले नशीब

केवळ गुरुदत्तमुळे जॉनीचे भाग्य बदलले. असे म्हटले जाते की, गुरु दत्तने जॉनीच्या प्रतिभेवर खूश होऊन त्यांना त्यांच्या ‘बाजी’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती. या चित्रपटाच्या नंतरच ते गुरु दत्तचे आवडते कलाकार बनले. ‘बाजी’च्या यशानंतर त्यांनी गुरु दत्तच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात काम केले. ‘आर-पार’, ‘मिस्टर अँड मिसेस 55’, ‘प्यासा’, ‘चौदहवीं का चांद’, ‘कागज के फूल’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

कसे बदलले नाव?

एका मित्राने जॉनी यांना एखादे वेगळे हटके नाव ठेवण्याचा सल्ला दिला होता. यानंतर त्या काळी प्रसिद्ध असलेल्या ‘जॉनी वॉकर’ या मद्याच्या नावावर त्यांनी आपले नाव जॉनी वॉकर असे बदलले. गुरु दत्त जॉनीच्या कामावर खूप खूष होते आणि त्यांना कारला भेट म्हणून दिली.

खास गाणी चित्रित केली!

चित्रपटांमध्ये जॉनीवर खास गाणी चित्रित केली गेली. गुरु दत्तच्या ‘सीआयडी’ चित्रपटात त्यांच्यावर चित्रित केलेले ‘ऐ दिल है मुश्कील जीना यहा’ हे गाणे प्रचंड गाजले. यानंतर, प्रत्येक चित्रपटात जॉनी यांच्यासाठी खास एक गाणे ठेवण्यात आले. ‘मैं बॉम्बे का बाबू’, ‘जंगल में मोर नाच किसने देखा’, ‘जाने कहां मेरा जिगर गया जी’ किंवा ‘प्यासा’ मधील ‘सर जो तेरा चक्राये’ अशा अनेक गाण्यांमध्ये ते दिसले.

चित्रपटांना अलविदा!

असे म्हटले जाते की, 70च्या दशकात जॉनी वॉकर यांनी चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले होते. कारण त्यांना असे वाटत होते की, चित्रपटांमधील विनोदाच्या पातळीत कमालीची घसरण झाली आहे. यानंतर त्यांनी 1986मध्ये आपल्या मुलाला चित्रपटसृष्टीत प्रस्थापित करण्यासाठी ‘ पहुंचे हुए लोग’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शनही केले, हा चित्रपट फ्लॉप ठरला. जॉनी यांनी त्यांच्या पाच दशकांच्या सिने कारकीर्दीत सुमारे 300 चित्रपटांत काम केले होते.

(Johnny Walker Death Anniversary actor once worked as a bus conductor)

हेही वाचा :

Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखचं बोल्ड फोटोशूट, सोशल मीडियावर धुमाकूळ

मराठमोळ्या दीपाली सय्यदची बॉलिवूडकरांना चपराक, भुदरगडमध्ये जाऊन तब्बल 10 कोटींची मदत

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...