AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठमोळ्या दीपाली सय्यदची बॉलिवूडकरांना चपराक, भुदरगडमध्ये जाऊन तब्बल 10 कोटींची मदत

अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. भुदरगड तालुक्यातील (Deepali Sayed Bhudargad) ग्रामीण भागात जाऊन त्यांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल 10 कोटींची मदत जाहीर केली.  

मराठमोळ्या दीपाली सय्यदची बॉलिवूडकरांना चपराक, भुदरगडमध्ये जाऊन तब्बल 10 कोटींची मदत
अभिनेत्री दीपाली सय्यद
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 6:53 PM
Share

कोल्हापूर : अर्ध्या महाराष्ट्राला तुफान पाऊस, महापूर आणि दरड दुर्घटनांनी उद्ध्वस्त केलं. जसजसा महापूर ओसरत आहे, तसतशी त्याची दाहकत समोर येत आहे. अनेक भागात नेते, अभिनेते दौरे करत आहेत. अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. भुदरगड तालुक्यातील (Deepali Sayed Bhudargad) ग्रामीण भागात जाऊन त्यांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल 10 कोटींची मदत जाहीर केली.

दीपाली सय्यद यांनी भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. दीपाली सय्यद म्हणाल्या, “भयंकर आहे सगळं. जेव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. लोक धाय मोकलून रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. प्रत्येक घराघरात एकच चित्र आहे. दोन वर्षापूर्वीही असंच झालं होतं. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागात मोठं नुकसान झालं आहे. मी हे चित्र डोळ्याने बघितलं आहे. काहीच उरलं नाहीय. दोन वर्ष कोरोना महामारीत गेलंय. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघाताना भयानक वाटलं. देव किती परीक्षा घेणार? स्ट्राँग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या. कोरोना येतोय, पूर येतोय”

Deepali Sayed

दीपाली सय्यद

कोण आहे दीपाली सय्यद?

  1. दीपाली सय्यद यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
  2. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मुंब्रा-कळवा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला
  3. दीपाली सय्यद यांनी साकळाई उपसा सिंचन योजना पूर्ण होण्यासाठी उपोषण केल्यामुळे चर्चेत आल्या होत्या.
  4. दीपाली सय्यद या अभिनेत्री म्हणून परिचीत आहेत
  5. अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि रिअलिटी शोमध्ये दीपाली सय्यद दिसल्या होत्या.
  6. दीपाली सय्यद यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आपकडून निवडणूक लढवली होती.
  7. त्या निवडणुकीत दीपाली सय्यद यांचा पराभव झाला होता.
  8. दीपाली सय्यद यांनी आप सोडून विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेते प्रवेश केला होता
  9. गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद सामाजिक कार्यांमध्ये पाहायला मिळत आहेत.
  10. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांना पाठिंबा दिला होता.

VIDEO : दीपाली सय्यद यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत

संबंधित बातम्या  

VIDEO : धीर तरी कसा देऊ, हातावर नोटा ठेवून उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडल्या

जितेंद्र आव्हाडांनी अभिनेत्री दीपाली सय्यदसाठी गायलं खास गाणे

सुजय विखेंना ‘या’ अभिनेत्रीचा एका अटीवर पाठिंबा!

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.