KRK | कमाल आर खानची दुपारपर्यंत कारागृहातून होणार सुटका, वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी झाली होती अटक…

न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर कमाल आर खानची आज दुपारी 12 वाजता ठाणे कारागृहातून सुटका होणार आहे. कमाल खानला मालाड पोलिसांनी वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अटक केली होती

KRK | कमाल आर खानची दुपारपर्यंत कारागृहातून होणार सुटका, वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी झाली होती अटक...
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 9:32 AM

मुंबई : अभिनेता KRK अर्थात कमाल रशीद खान (Kamal R Khan) यांना मोठा दिलासा मिळायं. आक्षेपार्ह ट्विटमुळे KRK ला तुरुंगात जावे लागले. केआरकेवर आरोप आहे की, बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्या मृत्यूनंतर आक्षेपार्ह ट्विट केले. आता KRK ला न्यायालयाने (Court) जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिलायं. कमाल रशीद खान कायम आक्षेपार्ह ट्विट (Tweet) करून मोठा वाद निर्माण करतात. KRK च्या टार्गेटवर कायम बाॅलिवूडचे कलाकार असतात. मात्र, 2020 मध्ये केलेले एक ट्विट KRK ला चांगलेच भोवल्याचे दिसते आहे.

मुंबई विमानतळावरून पोलिसांनी KRK ला केली होती अटक

न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर कमाल आर खान यांची आज दुपारी 12 वाजता ठाणे कारागृहातून सुटका होणार आहे. कमाल खानला मालाड पोलिसांनी वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अटक केली होती. मुंबई विमानतळावरून पोलिसांनी KRK ला अटक करत न्यायालयात नेले होते. काल बोरिवली कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान कमाल खानला जामीन मिळालायं. आता सुटकेनंतर कमाल आर खान नेमके काय ट्विट करतात, हे बघण्यासारखे ठरले.

हे सुद्धा वाचा

न्यायालयाकडून KRK ला मिळाला मोठा दिलासा

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्या मृत्यूवर भाष्य केल्याबद्दल KRK न्यायालयीन कोठडीत असताना एका अभिनेत्रीने विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला होता. 27 वर्षीय पीडितेने पोलिस तक्रार दाखल केली होती की ती 2017 मध्ये मुंबईत आली होती, जिथे तिची केआरकेसोबत एका घरगुती पार्टीत भेट झाली आणि त्यानंतर या अभिनेत्रीचा KRK ने विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.