‘तेजस’ चित्रपटात कंगना वायुसेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) बहुचर्चिच चित्रपट ‘तेजस’ (Tejas)ची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:25 AM, 1 Mar 2021
'तेजस' चित्रपटात कंगना वायुसेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) बहुचर्चिच चित्रपट ‘तेजस’ (Tejas)ची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. तेजस चित्रपटात कंगना एका वायुसेनेच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने सोशल मीडियावर याचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले आहे की, वायुसेनेच्या वर्दीवर हे नाव दिसल्याने छान वाटत आहे. (Kangana Ranaut in the role of an Air Force officer in the film Tejas)

‘तेजस’ चित्रपटासोबत कंगना तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिक ‘थलाइवी’मध्ये दिसणार आहे. ए.एल. विजय दिग्दर्शित हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. कंगना तिच्या आगामी ‘धाकड’ (Dhaakad) चित्रपटाचे भोपाळमधील शूटिंग पूर्ण केलं आहे. कंगनाने यांची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. कंगनाने एक ट्विट करत म्हटंले होते की, शेड्यूल रॅप अलर्ट …. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली टीम… सोहेलचे आभार

कंगनाचा धाकड’ चित्रपटातील खतरनाक अवतार समोर आला होता. तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि काळे डाग दिसत होते आणि ती रागाने पाहत होती. कंगनाने हा फोटो शेअर करताना लिहिले होते की, युध्दाचे मैदान अशी एकमेव जागा आहे ज्यामधून ती कधीच बाहेर पडत नाही. चित्रपटाची शूटिंग शिफ्ट संपल्यानंतर बैतूल शहरामध्ये चक्क खरेदी करण्यासाठी कंगना बाहेर पडली होती.

यावेळी कंगना मातीचे भांडे खरेदी करताना दिसली होती. मातीचे भांडे खरेदी करताना ती एका लहान मुलाला त्या बद्दल प्रश्न विचारताना दिसत होती. तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ट्विटवर तो व्हिडीओ कंगनाने रिट्विट करत म्हटंले होते की, शेवटी नाईट शिफ्ट संपली. काल बैतूलमध्ये खरेदी करण्यासाठी गेले आणि बरीच सुंदर मातीचे भांडे विकत घेतले.

संबंधित बातम्या : 

‘गंगूबाई काठियावाडी’चे शूटिंग सुरू, अजय देवगणही चित्रीकरणात व्यस्त; पाहा फोटो

चाहत्याने मागितला चक्क स्मार्टफोन, सोनूने दिले ‘हे’ भन्नाट उत्तर!

Video : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारावर रिक्षा चालवण्याची वेळ

(Kangana Ranaut in the role of an Air Force officer in the film Tejas)