Karan Johar | ‘माझं घर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले नाहीय…’, ‘कोरोना पार्टी’वर करण जोहरचे स्पष्टीकरण!

चित्रपट निर्माता करण जोहरची (Karan Johar) पार्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याच्या पार्टीतून पसरलेला कोरोना अनेकांसाठी अडचणीचा ठरला आहे. कारण ही पार्टी करण जोहरच्या घरी आयोजित करण्यात आली होती, जिथे सेलेब्सचा गलका जमला होता आणि यातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती.

Karan Johar | ‘माझं घर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले नाहीय...’, ‘कोरोना पार्टी’वर करण जोहरचे स्पष्टीकरण!
Karan Johar Party
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 1:30 PM

मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहरची (Karan Johar) पार्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याच्या पार्टीतून पसरलेला कोरोना अनेकांसाठी अडचणीचा ठरला आहे. कारण ही पार्टी करण जोहरच्या घरी आयोजित करण्यात आली होती, जिथे सेलेब्सचा गलका जमला होता आणि यातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता पार्टी होस्ट करण जोहर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्यानंतर आता स्वतःवरील सर्व आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी करणने एक पोस्ट लिहिली आहे.

इन्स्टा पोस्टमध्ये त्याचे स्पष्टीकरण देताना, करण जोहरने लिहिले की, ‘मी, माझे कुटुंब आणि घरी उपस्थित असलेल्या प्रत्येकाची RTPCR चाचणी झाली. देवाच्या कृपेने आपण सर्वजण कोरोना निगेटिव्ह निघालो. सुरक्षिततेच्या उद्देशाने माझी कोरोना चाचणी दोनदा करण्यात आली. पण मी दोन्ही वेळा निगेटिव्ह आलो आहे. शहर सुरक्षित ठेवण्याच्या या अपारप्रयत्नांचे मी कौतुक करतो. मी खरंच त्यांना सॅल्यूट करतो.’

करण जोहरचे स्पष्टीकरण

यानंतर आपली नाराजी व्यक्त करत करण जोहरने लिहिले की, ‘मी मीडियाच्या काही सदस्यांना हे स्पष्ट करू इच्छितो की 8 लोकांच्या उपस्थित झालेल्या या जेवणाच्या कार्यक्रमाला पार्टी म्हटले जात नाही. माझे घर, जिथे कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल कडक पाळले जातात, ते नक्कीच कोरोनाचे हॉटस्पॉट ठरणार नाही. आपण सर्व जबाबदार लोक आहोत. पूर्ण वेळ मास्क घालतो. महामारीला कोणीही हलक्यात घेतलेले नाही. मी मीडियाच्या काही सदस्यांना त्यांच्या वृत्तांकनावर थोडा संयम ठेवण्याचे आवाहन करतो. कृपया तथ्य नसलेले वार्तांकन टाळा.’

पाहा पोस्ट :

करीना-अमृता यांना कोरोना झाला कसा?

नुकतीच करण जोहरच्या घरी ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक छोटीशी पार्टी आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये करीना कपूर, अमृता अरोरा, सीमा खानसह इतर सेलिब्रिटी उपस्थित होते. या पार्टीतूनच सेलिब्रिटींमध्ये कोरोना पसरल्याचे वृत्त आहे. सर्वप्रथम सीमा खान यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर करीना कपूर, अमृता अरोरा, महीप कपूर या व्हायरसच्या विळख्यात आल्या. सर्व सेलिब्रिटी होम क्वारंटाईनमध्ये आहेत. या सर्वांच्या वैद्यकीय स्थितीवर बीएमसी दररोज लक्ष ठेवून आहे. मंगळवारी करीना, अमृता आणि करण जोहरच्या घराची स्वच्छता करण्यात आली.

हेही वाचा :

Rushikesh Wamburkar | कॉमेडीची बुलेट ट्रेननंतर, ‘A फक्त तूच’ चित्रपटात ऋषिकेश साकारणार ‘पक्या’ची भूमिका!

Attack : जानेवारीत होणार ‘अटॅक’! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज

Pushpa The Rise | प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा नवा विक्रम!

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.