Kareena Kapoor Khan : रोनाल्डोच्या ‘त्या’ निर्णयावर करीनाची जबरदस्त कमेंट, सोशल मीडियावर केले मीम्स शेअर

रोनाल्डोच्या व्हिडीओवर करीना कपूर खाननं तिच्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत तिच्या 'जब वी मेट' या चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग शेअर केला आहे. (Kareena Kapoor's strong comment on Ronaldo's decision, shared memes on social media)

Kareena Kapoor Khan : रोनाल्डोच्या 'त्या' निर्णयावर करीनाची जबरदस्त कमेंट, सोशल मीडियावर केले मीम्स शेअर

मुंबई : प्रसिद्ध फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) सध्या सर्वत्र चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे रोनाल्डो यावेळी त्याच्या खेळामुळे नाही तर सॉफ्ट ड्रिंक बाजूला करत पाण्याची बॉटल पुढे करण्यामुळे चर्चेत आहे. रोनाल्डोनं नुकतंच एका पत्रकार परिषदेत कोकची बॉटल बाजूला काढून सर्वांना पाणी पिण्याची विनंती केली होती. त्यानंतर या विषयावर मीम्स तयार होण्यास सुरुवात झाली आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘पाण्याचं काम पाणीच करतं..’

करिनानं आपल्या चित्रपटाच्या एका संवादातून हे स्पष्ट केलं की पाण्याचं काम पाणीच करू शकतं. आता करीनाची ही प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे.

करीनाला जब वी मेटचा हा संवाद आठवला

रोनाल्डोच्या व्हिडीओवर करीना कपूर खाननं तिच्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत तिच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग लिहिला आहे. अभिनेत्रीनं लिहिलं आहे की कोक-सोडा सर्व काही त्याच्या जागी आहे, पाणी पाण्याचं काम करतं.

करीनाचा संवाद व्हायरल

करीनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांना करीनाची ही पोस्ट प्रचंड आवडली आहे. तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इम्तियाज अलीच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या एका सीनमध्ये असं आहे की करीना एका दुकानदाराकडे पाणी मागण्यासाठी जाते आणि म्हणते की कोक-सोडा त्याच्या जागेवर पण पाणी पाण्याचं काम करते. करीनाचा हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता. अशा परिस्थितीत, हे शेअर करताना, तिनं आणखी 100 छान इमोजी पोस्ट केले आहेत.

काय आहे प्रकरण?

नुकतंच रोनाल्डोनं युरोपियन चँपियनशिपमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानं आपल्या समोर ठेवलेल्या कोकाकोलाच्या बॉटल्स काढून पाण्याच्या बॉटल्स ठेवल्या. बातमीनुसार, त्यानंतर कोको-कोलाच्या कंपनीला सुमारे चार अब्ज डॉलर्सचा झटका बसला आहे.

संबंधित बातम्या

Video : अनुष्का शर्माच्या अ‍ॅक्टिंग क्लासचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा अ‍ॅक्टिंग स्किल्स

Father’s Day : कियारा ते महेश बाबूपर्यंत सेलिब्रिटींच्या खास पोस्ट, ‘फादर्स डे’च्या दिल्या शुभेच्छा!

Father’s Day 2021 : ‘फादर्स डे’ निमित्त हीना खानची भावनिक पोस्ट, म्हणाली हे फोटो तुम्हाला दाखवले नाही कारण…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI