Father’s Day : कियारा ते महेश बाबूपर्यंत सेलिब्रिटींच्या खास पोस्ट, ‘फादर्स डे’च्या दिल्या शुभेच्छा!

वडिलांचे प्रेम आणि त्याची सावली प्रत्येकासाठी मौल्यवान असते. आज 20 जून रोजी सर्वत्र फादर्स डे साजरा केला जात आहे. प्रत्येकासाठी आई-वडील हे नातं फार स्पेशल असतं. आई हे घराचं मांगल्य असते, तर वडील हे अस्तित्व असतात.

Father’s Day : कियारा ते महेश बाबूपर्यंत सेलिब्रिटींच्या खास पोस्ट, 'फादर्स डे'च्या दिल्या शुभेच्छा!
फादर्स डे
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 20, 2021 | 11:47 AM

मुंबई : वडिलांचे प्रेम आणि त्याची सावली प्रत्येकासाठी मौल्यवान असते. आज 20 जून रोजी सर्वत्र फादर्स डे साजरा केला जात आहे. प्रत्येकासाठी आई-वडील हे नातं फार स्पेशल असतं. आई हे घराचं मांगल्य असते, तर वडील हे अस्तित्व असतात, असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं. प्रत्येक वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात. जगभरात जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी Fathers Day साजरा केला जातो. (Celebrities shared special posts on the occasion of Father’s Day)

फादर्स डेच्या निमित्याने फराह खानपासून कियारा अडवाणीपर्यंत सर्व सेलिब्रिटी हा दिवस साजरा करत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कशाप्रकारे सेलिब्रिटींनी फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फराह खानने तिच्या नवऱ्याचा आणि मुलांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, कधीकधी मला जलन होते की, तु इतका चांगला पप्पा कसा आहेस.

View this post on Instagram

A post shared by Soha (@sakpataudi)

सोहा अली खानने कुणाल खेमूचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मुलगी इनायाच्या केसांना तेल लावताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना सोहाने लिहिले आहे की, फक्त फादर्स डेच्या निमित्ताने

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूंनी एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, माझे नायक, मार्गदर्शक, शक्ती, प्रेरणा…तुम्ही आहात आणि माझ्यासाठी बरेच काही आहात. हॅपी फादर्स डे नन्ना

View this post on Instagram

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अभिनेता अनिल कपूरने वडिलांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, निष्ठावंत, प्रामाणिक, दयाळू आणि खरा मित्र राहण्यासाठी… हेच गुण मी माझ्या आयुष्यात आत्मसात तुमच्याकडून  केले आहेत, त्यांनी मला स्वातंत्र्य दिले, मला परवानगी दिली माझ्या चुकांमधून शिकण्याची आणि मला माहित होते की, ते नेहमीच माझ्या मागे आहेत … हे सर्व त्याच्यामुळेच आहे … हॅपी फादर्स डे

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांनी आपल्या वडिलांचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की, मी माझ्या आयुष्यात सर्व काही मिळवले आहे. परंतू जेव्हा वडिलांनी मला त्यांच्या खांद्यावर उचलले तेव्हा मी आकाशाला स्पर्श केला. कियारा अडवाणीने तिच्या वडिलांसोबत काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, या सर्व फोटोंमध्ये अभिनेत्री आणि तिच्या वडिलांमधील प्रेम स्पष्ट दिसून येत आहे.

संबंधित बातम्या : 

Father’s Day 2021 : ‘फादर्स डे’ निमित्त हीना खानची भावनिक पोस्ट, म्हणाली हे फोटो तुम्हाला दाखवले नाही कारण…

IND vs NZ WTC Final | टीम इंडिया जिंकल्यास कपडे उतरवेन, असं पुन्हा म्हणू का? पूनम पांडेचा बोल्ड प्रश्न

(Celebrities shared special posts on the occasion of Father’s Day)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें