‘तुमसे अच्छ कौन है’ म्हणत रातोरात स्टार झाला, पाहा आता काय करतोय अभिनेता नकुल कपूर

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी आपल्या एंट्रीने प्रत्येकाचे मन जिंकले. पण, नंतर ते कुठे गायब झाले, ते कुणालाच माहिती नाही. यापैकी काही सेलेब्रिटी इतर देशात राहत आहेत, तर काहींनी मनोरंजन विश्वाला निरोप दिला आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत.

‘तुमसे अच्छ कौन है’ म्हणत रातोरात स्टार झाला, पाहा आता काय करतोय अभिनेता नकुल कपूर
नकुल कपूर

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी आपल्या एंट्रीने प्रत्येकाचे मन जिंकले. पण, नंतर ते कुठे गायब झाले, ते कुणालाच माहिती नाही. यापैकी काही सेलेब्रिटी इतर देशात राहत आहेत, तर काहींनी मनोरंजन विश्वाला निरोप दिला आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. ‘तुमसे अछा कौन है’ हा चित्रपट बहुतेक सर्वांनाच आठवत असेल. आज आपण या चित्रपटाचा मुख्य अभिनेता नकुल कपूर (Nakul Kapoor) याच्याबद्दल बोलणार आहोत (know where is tumse accha kaun hai fame actor nakul kapoor now).

‘तुमसे अच्छ कौन है’ या चित्रपटात आरती छाब्रिया आणि किम शर्मा, नकुल सोबत मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटातील नकुलची देसी स्टाईल प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना खूप आवडली. या चित्रपटामुळे नकुल रातोरात एक स्टार बनला होता. त्याने लाखो लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले होते. मात्र, या चित्रपटा नंतर नकुल इतर कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. चला तर आज जाणून घेऊया सध्या हा अभिनेता कुठे आहे आणि काय करतो आहे?

अल्बमने केली कारकिर्दीची सुरुवात!

नकुलने त्याच्या करिअरची सुरुवात ‘हो गई है मोहब्बत तुमसे’ या अल्बमने केली होती. यानंतर त्याने ‘आजा मेरे यार’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. नकुलला खरी ओळख 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुमसे अच्छा कौन है’ फिल्ममधून केली होती. या चित्रपटामुळे तो रातोरात एक स्टार झाला होता. पण, त्यानंतर त्याला कोणत्याही चित्रपटाची ऑफर मिळाली नाही. चित्रपटांमध्ये काम मिळत नसल्यामुळे नकुलने टीव्ही जगात प्रवेश केला. 2005 साली त्यांनी ‘टर्मिनल सिटी’ या टीव्ही मालिकेत काम केले होते. मात्र, नकुलने केवळ एकाच मालिकेत काम केले. त्यानंतर काम नसल्यामुळे नकुलने मनोरंजन विश्वाचाच निरोप घेतला होता.

आता बनला योगा प्रशिक्षक

नकुल कपूर आजकाल बॉलिवूडपासून दूर कॅनडामध्ये राहत आहे. सध्या तो एक योगा प्रशिक्षक बनला आहे. तो लोकांना योगा शिकवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करत आहे. नकुलचे ‘डीवाईन लाईट’ नावाचे एक योगा सेंटर देखील आहे. काही काळापूर्वी नकुलचा सध्याचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याचे वजन खूप वाढलेले दिसत होते आणि त्याची दाढी देखील वाढली होती.

(know where is tumse accha kaun hai fame actor nakul kapoor now)

हेही वाचा :

Photo : लग्नानंतर काजल अग्रवालचा पहिला वाढदिवस, पती गौतम किचलूकडून खास पोस्ट शेअर

PHOTO | सैफचा देखणा चेहरा पाहून चिडलेल्या त्या व्यक्तीने काचेचा ग्लास फेकून मारला अन्….

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI