Kartik Aaryan: कार्तिक आर्यनला पुन्हा कोरोनाची लागण; म्हणाला, ‘सब कुछ इतना पॉझिटिव्ह चल रहा था..’

कार्तिकला कोरोनाची लागण झाल्याने तो 'आयफा पुरस्कार' सोहळ्यातही अनुपस्थित राहणार आहे. बॉलिवूडमधील हा सर्वांत चर्चेतला पुरस्कार असून अबुधाबीतील यास आयलँडवर या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनला पुन्हा कोरोनाची लागण; म्हणाला, 'सब कुछ इतना पॉझिटिव्ह चल रहा था..'
Kartik AaryanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 9:51 AM

अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) दुसऱ्यांदा कोरोना विषाणूची (COVID positive) लागण झाली आहे. कार्तिकने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कार्तिकला पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याने ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर तो आजारी पडला. आता पुन्हा एकदा त्याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘सब कुछ इतना पॉझिटिव्ह चल रहा था, कोव्हिड से रहा नहीं गया’ (सगळं काही इतकं छान सकारात्मक सुरू होतं, पण कोव्हिडला ते पहावलं नाही गेलं), अशी उपरोधिक पोस्ट त्याने सोशल मीडियावर लिहिली आहे. कार्तिकच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांना त्याला लवकर बरं होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. ‘तू तुझ्या चित्रपटासाठी इतकी मेहनत घेतलीस, त्याला बॉक्स ऑफिसवर यशदेखील मिळालं. आता तुला थोडं आराम करायची गरज आहे’, असंही एका युजरने म्हटलं.

कार्तिकला कोरोनाची लागण झाल्याने तो ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्यातही अनुपस्थित राहणार आहे. बॉलिवूडमधील हा सर्वांत चर्चेतला पुरस्कार असून अबुधाबीतील यास आयलँडवर या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सलमान खान, बॉबी देओल, सारा अली खान, टायगर श्रॉफ, शाहिद कपूर यांसारखे अनेक बॉलिवूड कलाकार या पुरस्कार सोहळ्याला पोहोचले आहेत.

हे सुद्धा वाचा

कार्तिक आर्यनची पोस्ट-

अनीस बाजमी दिग्दर्शित कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाने दहा दिवसांत 122.69 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात कार्तिकसोबतच कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. सीक्वेल असला तरी या चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी आहे. प्रियदर्शनने अक्षय कुमार आणि विद्या बालनचा पहिला भाग दिग्दर्शित केला होता. आगामी काळात कार्तिक आर्यनचे ‘शहजादा’, ‘कॅप्टन इंडिया’, ‘फ्रेडी’ हे चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.