अमिताभ अन् जया बच्चन यांची लग्नपत्रिका व्हायरल, पत्रिकेतील त्या चार ओळींवर होऊ लागली चर्चा, कारण…

Amitabh Bachchan Wedding Card : शोमध्ये आमिर खान अमिताभ बच्चन यांना विचारतो. तुम्हाला तुमच्या लग्नाची तारीख आठवते का? त्यावर अमिताभ बच्चन उत्तर देत सांगतात 3 जून 1973. पुढे जे घडते, त्यामुळे अमिताभ यांनाही हसू येते...

अमिताभ अन् जया बच्चन यांची लग्नपत्रिका व्हायरल, पत्रिकेतील त्या चार ओळींवर होऊ लागली चर्चा, कारण...
amitabh bachchan jaya bachchan wedding card
| Updated on: Oct 09, 2024 | 9:51 AM

Kaun Banega Crorepati: बॉलीवूडचा बादशाह अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचे लग्न 51 वर्षांपूर्वी झाले होते. त्या लग्नाची पत्रिका आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही लग्नपत्रिका व्हायरल होण्यास कारण अभिनेता आमिर खान आहे. आमिर खान ‘कौन बनेगा करोडपती 16’ च्या विशेष एपिसोडमध्ये आले. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त बनवलेला हा एपिसोड येत्या 11 ऑक्टोंबर रोजी प्रसारीत होणार आहे. या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लग्नाबद्दल खुलासा केला. यावेळी मंचावर विशेष पाहुणे म्हणून आमिर खान आणि त्यांचा मुलगा जुनैद खान होता.

अन् अमिताभ यांनाही हसू आले…

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न 3 जून 1973 रोजी झाले होते. त्यांच्या या लग्नाला जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. या शोमध्ये आमिर खान अमिताभ बच्चन यांना विचारतो. तुम्हाला तुमच्या लग्नाची तारीख आठवते का? त्यावर अमिताभ बच्चन उत्तर देत सांगतात 3 जून 1973. त्यावर आमिर खान म्हणतो, तुमच्याकडे काय पुरावा आहे. कारण माझ्याकडे तुमच्या लग्नाची पत्रिका आहे. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे तुमची लग्नपत्रिकासुद्धा माझ्याकडे आहे. हे ऐकल्यावर अमिताभ यांनाही हसू येते.

लग्नपत्रिकेतील त्या चार ओळींची चर्चा

आमिर खान यांनी बिग बी आणि जया बच्चन यांची लग्नपत्रिका सर्व प्रेक्षकांना केबीसमध्ये दाखवली. त्यांचा प्रोमो सोनी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. त्या लग्नपत्रिकेत रामायणातील अयोध्या कांडमधील चौपाई आहे. ती चौपाई राम-सीता यांच्या विवाह संदर्भातील आहे. “जब तें रामु ब्याहि घर आए । नित नव मंगल मोद बधाए” अशी चौपाई आहे. पत्रिकेते एका बाजूला हिंदी तर दुसऱ्या बाजूला इंग्रजी मजकूर आहे. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

कौन बनेगा करोडपती 16 मध्ये आलेले अभिनेता आमिर खान यांचा विशेष भाग अमिताभ बच्चन यांच्या जन्मदिनी 11 ऑक्टोबर रोजी प्रसारीत होणार आहे. त्या एपिसोडचा प्रोमो सोनी टीव्हीकडून करण्यात आला आहे. या एपिसोडमधून प्रेक्षकांना अनेक जुने किस्से मिळणार आहे. तसेच बॉलीवूडमध्ये काम केलेल्या अनेक प्रतिष्ठित कलाकारांची अनोखी जुगलबंदी दिसणार आहे.