Khoya Khoya Chand | आमिरसोबत ‘लगान’मध्ये काम करून प्रसिद्धी झोतात आली ग्रेसी सिंह, आता मनोरंजन विश्वापासून दूर करतेय ‘हे’ काम!

| Updated on: Aug 05, 2021 | 9:58 AM

बॉलिवूडमध्ये स्थिरावणे खूप कठीण काम आहे. या विश्वात प्रत्येकाला दमदार पदार्पण करायचे असते आणि मोठ्या चित्रपटांमध्ये काम करायचे असते. प्रत्येकालाचा स्टारडम हवा असतो.

Khoya Khoya Chand | आमिरसोबत ‘लगान’मध्ये काम करून प्रसिद्धी झोतात आली ग्रेसी सिंह, आता मनोरंजन विश्वापासून दूर करतेय ‘हे’ काम!
ग्रेसी सिंह
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये स्थिरावणे खूप कठीण काम आहे. या विश्वात प्रत्येकाला दमदार पदार्पण करायचे असते आणि मोठ्या चित्रपटांमध्ये काम करायचे असते. प्रत्येकालाचा स्टारडम हवा असतो. पण, हे प्रत्येकासोबत होत नाही, असे काही बॉलिवूड स्टार्स असेही आहेत जे काही चित्रपटांनंतर इंडस्ट्रीला अलविदा म्हणतात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री ग्रेसी सिंह (Gracy Singh) हे एकेकाळी बॉलिवूडमध्ये मोठे नाव होते. संजय दत्तच्या ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि ‘गंगाजल’ या चित्रपटात दिसलेली ग्रेसी सिंह हळूहळू बॉलिवूडमधून गायब झाली.

ग्रेसी ‘संतोषी माता’ या मालिकेतही दिसली आहे. पण काही चित्रपटांमध्ये मोठ्या भूमिका केल्यानंतर ग्रेसी सिंहने बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली, पण आज अभिनेत्री बॉलिवूडमधून पूर्णपणे गायब आहे. ग्रेसीचा जन्म 20 जुलै 1980 रोजी दिल्लीत झाला. अभिनेत्रीच्या कुटुंबातील सदस्यांना तिने डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवे अशी खूप इच्छा होती. परंतु, शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रेसीने मॉडेल होण्याचा विचार केला आणि 1997 मध्ये तिने ‘अमानत’ या टीव्ही सीरियलद्वारे अभिनय जगात प्रवेश केला. या मालिकेतून ग्रेसीला चांगलीच पसंती मिळाली होती. मालिकेत काम करताना, अभिनेत्रीने अनेक छोट्या -मोठ्या चित्रपटांमध्येही काम करण्यास सुरुवात केली. 2001 मध्ये तिला ‘लगान’ मिळाला आणि एका रात्रीत तिचे नशीब बदलले. 2003 मध्ये रिलीज झालेल्या अजय देवगणच्या ‘गंगाजल’ या चित्रपटातही ग्रेसी एका सुंदर शैलीत दिसली होती. या चित्रपटात तिने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

अनेक अभिनेत्रींचं पदार्पण

ज्या काळात ग्रेसी या चित्रपटांमध्ये काम करत होती, त्या काळात इतर अनेक मोठ्या अभिनेत्री होत्या ज्या सिनेमात दाखल झाल्यानंतर उत्कृष्ट काम करत होत्या. या यादीत अभिनेत्री राणी मुखर्जी, प्रीती झिंटा आणि ऐश्वर्या राय या सर्व अभिनेत्रींचा समावेश आहे. या सगळ्याच्या दरम्यान ग्रेसीला काम मिळणे पूर्णपणे बंद झाले. ज्यामुळे अभिनेत्री चित्रपट जगतापासून दूर गेली. कामाच्या अनुपलब्धतेमुळे, अभिनेत्रीने तिला देऊ केलेली सर्व कामे करण्यास सहमती दर्शवली. तिने कमाल आर खानच्या चित्रपट ‘देशद्रोही’ मध्येही काम केले. कामाच्या अभावामुळे अभिनेत्रीने मनोरंजन विश्वाचा निरोप घेण्याचे निश्चित केले.

मेहनत करेन पण…

अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, “मी कठोर परिश्रम करू शकते, पण लोकांची चापलूसी करणे माझे काम नाही. चित्रपटसृष्टीत सुरू असलेली लढाई माझ्या नियंत्रणाबाहेर आहे, मला ती समजतही नाही. भूमिका मिळवण्यासाठी निर्मात्याकडे जाणे, त्याच्या पार्टीला उपस्थित राहणे ही गोष्ट माझ्याच्याने होणार नाही. ज्यामुळे मला काम मिळणे कधीथांबले ते मला कळलेही नाही.”

ग्रेसीने अध्यात्माशी जोडले नाते

ग्रेसीला लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. बॉलिवूडमधील आपल्या कारकिर्दीचा शेवट पाहून तिने ब्रह्माकुमारींमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. ती एक उत्तम भरत नाट्यम नृत्यांगना देखील आहे. ब्रह्माकुमारींमध्ये सामील झाल्यानंतर, अभिनेत्री आता दरवर्षी तेथे जाते आणि आयोजित कार्यक्रमांमध्ये भाग घेते. अनेक वेळा ग्रेसीने तिथे परफॉर्मन्सही दिला आहे. अध्यात्माशी जुळल्यानंतर अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णयही रद्द केला. 40 वर्षीय अभिनेत्री आता एकटीच राहत पसंत आहे.

(Khoya Khoya Chand know about lagan fame actress Gracy Singh)

हेही वाचा :

‘देवमाणूस’च्या अजित कुमारचं काम वाढलं म्हणून बज्याने आणला नवा असिस्टंट, पाहा कलाकारांचा धमाल व्हिडीओ

 ‘इंदिरा गांधीं’च्या भूमिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? नेटकरी करतायत मेकअप आर्टिस्टचं कौतुक!