आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाची जबरदस्त ओपनिंग, पाहा पहिल्या दिवशीचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन

आयुष्मान खुरानासोबतच रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची संपूर्ण स्टोरी ही डाॅक्टरांच्या भोवती फिरणारी आहे.

आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाची जबरदस्त ओपनिंग, पाहा पहिल्या दिवशीचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन
| Updated on: Oct 15, 2022 | 12:41 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) ‘डॉक्टर जी’ या चित्रपटाची खूप चर्चा आहे. आयुष्मानच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे चित्रपटाने (Movie) पहिल्याच दिवशी धडाकेबाज कामगिरी केलीये. कोरोनानंतर बाॅक्स ऑफिसवर बाॅलिवूडच्या चित्रपटाना काही खास कलेक्शन जमा करता आले नव्हते. मात्र, आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात आयुष्मान खुराना एका डाॅक्टरच्या (Doctor) भूमिकेत आहे.

विशेष: तरूणांमध्ये आयुष्मान खुरानाच्या डॉक्टर जी चित्रपटाबद्दल प्रचंड आकर्षक आहे. आयुष्मान खुरानासोबतच रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची संपूर्ण स्टोरी ही डाॅक्टरांच्या भोवती फिरणारी आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चाहते या चित्रपटाची वाट पाहात होते. आयुष्मानसोबतच या चित्रपटात रकुलने देखील जबरदस्त अभिनय केला आहे.

14 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या डॉक्टर जी चित्रपटाचे पाहिल्या दिवशीचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन पुढे आले असून चित्रपटाने चांगली सुरूवात केलीये. पहिल्या दिवशी 3.75 कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन करण्यात चित्रपटाला यश मिळाले. हा चित्रपट तयार करण्यासाठी 35 कोटींच्या बजेट होते. त्यातुलनेत चित्रपटाने चांगली कमाई पहिल्या दिवशी नक्कीच केलीये. भारतामध्ये हा चित्रपट 2500 स्क्रीनवर प्रदर्शित झालाय.