Mrunal Dusanis : लेकीच्या येण्याने बदललं मृणाल दुसानिसच्या घराचं रूप, शेअर केला खास व्हीडिओ…

Mrunal Dusanis : अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या तिचं आईपण इन्जॉय करताना दिसतेय. तिने नुकतंच एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात लेकीच्या येण्याने तिच्या घरात कसा बदल झालाय हे तिनं सांगितलं आहे.

Mrunal Dusanis : लेकीच्या येण्याने बदललं मृणाल दुसानिसच्या घराचं रूप, शेअर केला खास व्हीडिओ...
मृणाल दुसानिस, नीरज मोरे आणि नुर्वी
Image Credit source: मृणाल दुसानिस इन्स्टाग्राम
आयेशा सय्यद

|

Apr 10, 2022 | 6:08 PM

मुंबई : अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) सध्या तिचं आईपण इन्जॉय करताना दिसतेय. तिने नुकतंच एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात लेकीच्या येण्याने तिच्या घरात कसा बदल झालाय हे तिनं सांगितलं आहे. या व्हीडिओत तिने पती नीरज मोरेला (Neeraj More) बाळाशी गप्पा मारताना कॅपचर केलंय. तिने या व्हीडिओला दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे. “…आणि शेवटी नीरज बोलता झाला… नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही.. भयंकर शांतता… पण आता सगळं बदलतंय…”, असं कॅप्शन तिने दिलं आहे. हा व्हीडिओ शेअर करताना #fatherdaughterlove #happylife हे हॅशटॅगही वापरलेत. तिच्या या व्हीडिओला अनेकांनी लाईक केलंय तर काहींनी कमेंट करत तुमचं घर असंच हसतं-खेळतं राहो…, अश्या सदिच्छाही दिल्या आहेत.

मृणालची इन्स्टाग्राम पोस्ट

मृणालने नीरजला बाळाशी गप्पा मारताना मोबाईलमध्ये कॅपचर केलंय. तिने या व्हीडिओला दिलेलं कॅप्शनही तितकंच खास आहे. “…आणि शेवटी नीरज बोलता झाला… नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही.. भयंकर शांतता… पण आता सगळं बदलतंय…”, असं कॅप्शन तिने दिलं आहे. हा व्हीडिओ शेअर करताना #fatherdaughterlove #happylife हे हॅशटॅगही वापरलेत. तिच्या या व्हीडिओला अनेकांनी लाईक केलंय तर काहींनी कमेंट करत तुमचं घर असंच हसतं-खेळतं राहो…, अश्या सदिच्छाही दिल्या आहेत.

24 मार्च रोजी मृणालने मुलीला जन्म दिला. ‘डॅडींची छोटी मुलगी आणि मम्माचं संपूर्ण विश्व.. आमची चिमुकली परी’, असं कॅप्शन देत मृणालने एक फोटो शेअर केला. त्या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या. मृणालने तिच्या मुलीचं नावंसुद्धा जाहीर केलं आहे. ‘नूर्वी’ असं तिच्या मुलीचं नाव आहे. मृणालला ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. 2016 मध्ये तिने नीरज मोरेशी लग्न केलं. नीरज हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. लग्नानंतर ती अमेरिकेत वास्तव्यास आहे.

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांमध्येही मृणालने भूमिका साकारल्या आहेत. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका अर्ध्यातच सोडून तिने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती पुन्हा एकदा ‘हे मन बावरे’ मालिकेत दिसली.

संबंधित बातम्या

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : “मी आलियाचा हुंडा म्हणून तिच्या सासरी जाणार”, रणबीर-आलियाच्या लग्नात राखी सावंतची लगबग

Photo gallery | अभिनेत्री अभिज्ञा भावेने पती सोबत व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Photo Gallery | दोन मुलांची आई असलेल्या करीनाचा फिटनेस पाहून व्हाल आश्चर्य चकित

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें