Mehmood Birth Anniversary | ‘या’ अभिनेत्रीला स्टार बनवण्यासाठी मेहमूदला बहिणीकडून खावी लागली बोलणी, वाचा किस्सा…

अभिनेत मेहमूद अर्थात ‘मेहमूद अली’ (Mehmood Ali) भारतीय चित्रपटसृष्टीतील विनोदीचे बादशाह होते. त्यांचे संवाद आणि त्यांची शैली प्रेक्षकांना खूप हसवायची. मेहमूद यांनी आपल्या चार दशकांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत 300हून अधिक चित्रपट केले.

Mehmood Birth Anniversary | ‘या’ अभिनेत्रीला स्टार बनवण्यासाठी मेहमूदला बहिणीकडून खावी लागली बोलणी, वाचा किस्सा...
Mehmood Ali

मुंबई : अभिनेत मेहमूद अर्थात ‘मेहमूद अली’ (Mehmood Ali) भारतीय चित्रपटसृष्टीतील विनोदीचे बादशाह होते. त्यांचे संवाद आणि त्यांची शैली प्रेक्षकांना खूप हसवायची. मेहमूद यांनी आपल्या चार दशकांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत 300हून अधिक चित्रपट केले. आज मेहमूद यांची जयंती आहे. मेहमूद हे केवळ एक हुशार अभिनेते नव्हते, तर तो एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते, ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट दिले. मेहमूद अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे करिअर बनवण्यासाठीही ओळखले जातात. या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन आणि मुमताज यांची नावेही समाविष्ट आहेत.

आज, मेहमूद यांच्या जयंतीनिमित्त, आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगणार आहोत ज्याबद्दल तुम्ही कदाचित आधी कधीही ऐकले नसेल. हा किस्सा मुमताज यांना स्टारडम मिळण्याशी संबंधित आहे, ज्याच्या मागे मेहमूद यांचा सर्वात मोठा हात होता. मुमताजसाठी मेहमूद यांना खूप ऐकून देखील घ्याव लागलं होतं.

जेव्हा मुमताजच्या बहिणीने मेहमूद यांना खूप सुनावले…

मेहमूदने आपल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. मेहमूद म्हणतात की, मुमताज दारा सिंगची अभिनेत्री होती. त्यांनी दारा सिंगसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मी मुमताजची बहीण मल्लिकासोबत काम करायचो. मल्लिका माझी जोडीदार असायची. एके दिवशी मी मल्लिकाला तिच्या घरी भेटायला गेलो आणि तिथे मला मुमताज भेटली. ती खूप सुंदर होती. त्यानंतर मी तिला चित्रपटांमध्ये घेतले.

अभिनेता पुढे म्हणाले की, मला आठवते की तिची बहीण मल्लिका मुमताजमुळे खूप चिडली होती. मल्लिकाने मला खूप शिव्या दिल्या. तुम्ही असे आहात, तुम्ही असे आहात. तू माझ्याबरोबर काम करायचास आणि आता तू फक्त मुमताजला घेत आहेस. मी तिला अत्यंत विनम्रपणे मला माफ करण्यास सांगितले. ती तुझ्यापेक्षा चांगली आहे, म्हणून मी मुमताजला घेतले आहे. मला एक गोष्ट माहीत होती की, ही जागा मुमताजसाठी बनवलेली नाही म्हणजे ती माझ्याबरोबर पडद्यावर दिसण्यासाठी बनलेली नाही. असं झालं असतं तर ती आमच्यासारखीच कॉमेडियन बनून राहिली असती.

शशी कपूर यांनी मुमताजला नाकारले

शशी कपूर यांनी मुमताजला नाकारल्याचा क्षण आठवून मेहमूद म्हणाले की, 1966च्या ‘प्यार कीए जा’ या चित्रपटासाठी, मी शशी कपूर यांना एक अभिनेत्री म्हणून मुमताजला कास्ट करण्यासाठी आग्रह केला. यावर शशी म्हणाले की, दारा सिंग आणि मेहमूदची अभिनेत्री शशी कपूरची अभिनेत्री कशी बनेल? आणि मुमताज यांना त्यांची अभिनेत्री म्हणून घेण्यास नकार दिला.

अभिनेत्याने पुढे सांगितले की, यानंतर मुमताजने माझ्या आणखी एका चित्रपटात काम केले, ज्याचे नाव होते – ‘पती, पत्नी और वो’. यानंतर मुमताजने संजीव कुमार आणि दिलीप कुमार यांच्यासोबत एक चित्रपटही केला. ‘राम श्याम’ मध्ये दिलीप कुमारने मुमताजला सांगितले होते की, ती खूप लहान आहे आणि तिची जोडी माझ्याबरोबर कशी दिसेल? यावर मी त्याला सांगितले की बघ, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. जर ती एक अभिनेत्री म्हणून माझ्याबरोबर चांगली दिसू शकते, तर ती तुमच्याबरोबरही चांगली दिसेल.

मेहमूद म्हणाले की, त्यांना माझा मुद्दा पटला आणि मग मुमताजलाही त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर ती एक स्टार बनली आणि नंतर तिने उद्योगातील अनेक दिग्गज कलाकारांसह काम केले, ज्यात राजेश खन्ना आणि शशी कपूर ज्यांनी तिला आधी नाकारले होते ते देखील होते.

हेही वाचा :

Netflix Movies | नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार नव्या सीरीज आणि चित्रपट, पाहा यादी

वाढत्या वजनामुळे कपिल शर्माला शोमधून नाकारले आणि सुरु झाला ‘द कपिल शर्मा शो’, वाचा किस्सा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI