सलमान खानला मुंबई कोर्टाकडून दिलासा, प्लेस्टोअरच्या ‘सेलमोन भोई’ गेमवर घातली तत्काळ बंदी!

मुंबई सिव्हिल कोर्टाने प्ले स्टोर वरील 'सेलमोन भोई' (Selmon Bhoi) या खेळावर तात्काळ बंदी घातली आहे. तरुणांमध्ये या गेमबद्दल बरीच चर्चा आहे. हा गेम सलमान खान (Salman Khan) याच्या 'हिट अँड रन' आणि 'ब्लॅकबक हंटिंग' प्रकरणांवर आधारित आहे.

सलमान खानला मुंबई कोर्टाकडून दिलासा, प्लेस्टोअरच्या 'सेलमोन भोई' गेमवर घातली तत्काळ बंदी!
सलमान खान

मुंबई : मुंबई सिव्हिल कोर्टाने प्ले स्टोर वरील ‘सेलमोन भोई’ (Selmon Bhoi) या खेळावर तात्काळ बंदी घातली आहे. तरुणांमध्ये या गेमबद्दल बरीच चर्चा आहे. हा गेम सलमान खान (Salman Khan) याच्या ‘हिट अँड रन’ आणि ‘ब्लॅकबक हंटिंग’ प्रकरणांवर आधारित आहे. यामुळे सलमान खान या गेमच्या विरोधात कोर्टात गेला होता.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत. यात हिट अँड रन प्रकरणाचाही समावेश आहे, ज्याबद्दल बरेच वाद झाले. आता अलीकडेच या विषयावर ‘सेलमोन भोई’ नावाने एक ऑनलाइन मोबाईल गेम सुरू करण्यात आला होता. या गेमच्या विरोधात सलमान खान मुंबईच्या दिवाणी न्यायालयात पोहोचला होता आणि त्याने विरोधात खटला दाखल केला होता. यानंतर कोर्टाने सलमानला दिलासा देत गेमवर तात्पुरती बंदी घातली आहे.

सलमान खानचे चाहते त्याला ‘सलमान भाई’ म्हणतात. सलमान खानचे नाव जोडून या खेळाचे नाव तयार करण्यात आले होते. यामुळे त्यांच्या प्रतिमेला हानी पोहचत असल्याचा आरोप सलमान खानने केला होता. सलमान खानच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश केएम जयस्वाल यांनी या गेमवर त्वरित बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्टाने गेमवर घातली बंदी

सलमानच्या हिट अँड रन प्रकरणाच्या आधारावर हा गेम ठरवण्यात आला आहे. सलमानच्या नावाने अनेकदा मिम्स देखील बनवले जातात, ज्यात त्याला ‘सेलमोन भोई’ असेही म्हटले जाते, त्यामुळे या गेमच्या निर्मात्यानेही हेच नाव ता गेमला ठेवले आहे. यानंतर अभिनेत्याने गेमविरोधात दावा दाखल केला. या खेळाच्या माध्यमातून त्याची प्रतिमा खराब होत असल्याचा, आरोप त्याने केला आहे. अभिनेत्याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या खेळावर बंदी घातली आहे.

सलमानच्या नावाने चालू होते काम, न्यायालयाने लावला लगाम

कोर्ट म्हणते की, या खेळाची संकल्पना आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी सलमान खानशी संबंधित आहेत. ज्या कंपनीने हा गेम बनवला त्याने सलमान खानची परवानगी घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने हा गेम तयार करणाऱ्या कंपनी ‘पॅरोडी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड’ ला हा गेम गुगल प्ले स्टोअर आणि इतर प्लॅटफॉर्मवरून त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने आवश्यक बदल केल्यानंतरच कंपनीला गेम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

सलमान खानच्या नावावर सुरु होता गेम

गेमिंग कंपनीचा दावा आहे की, हा गेम काल्पनिक आहे. गेमच्या सुरुवातीलाच ‘सेलमोन भोई’ हे पात्र दारूच्या प्रभावाखाली वाहन चालवताना दाखवले आहे. आणि फक्त या गेममध्ये अॅनिमेटेड पात्र योगायोगाने सलमान खानसारखे दिसते. पण सलमानच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, कंपनीने बॉलिवूड अभिनेत्याचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर केला आहे आणि यासाठी कंपनीने सलमान खानची कोणतीही परवानगी घेतली नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.

हेही वाचा :

बोल्ड टॉपमध्ये ईशा गुप्ताच्या दिलखेचक अदा, नव्या फोटोंमध्ये दिसला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार!

Akshay Kumar Mother Death | अक्षय कुमारला मातृशोक, उपचारादरम्यान अरुणा भाटियांचे निधन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI