AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | कंगनाच्या अडचणी आणखी वाढणार! मुंबई पोलिसांनी दाखल केला नवा एफआयआर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या अडचणी सध्या संपण्याचं नावच घेत नाहीयत. आता पुन्हा एकदा तिच्याविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kangana Ranaut | कंगनाच्या अडचणी आणखी वाढणार! मुंबई पोलिसांनी दाखल केला नवा एफआयआर
कंगना रनौत
| Updated on: Mar 13, 2021 | 2:20 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या अडचणी सध्या संपण्याचं नावच घेत नाहीयत. आता पुन्हा एकदा तिच्याविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी ‘दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’ पुस्तकाच्या लेखकाने कंगनावर कॉपीराईट उल्लंघनाची तक्रार दाखल केली होती. यावर कोर्टाच्या आदेशानंतर आता मुंबई पोलिसांनी शुक्रवारी (13 मार्च) अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरूद्ध कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला आहे (Mumbai Police files new FIR against actress kangana ranaut).

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्री कंगनाशिवाय कमल कुमार जैन, रंगोली चंदेल आणि अक्षत रनौत यांच्याविरूद्धही खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ‘दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’ पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी कंगनावर कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप केला होता. या पुस्तकाची हिंदी अनुवादित आवृत्ती ‘दिद्दा काश्मीरकी योद्धा रानी’ या नावाने प्रकाशित झाली आहे.

कथेचा कॉपीराईट लेखकाकडे

‘दिद्दा काश्मीरकी योद्धा रानी’ या पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी कंगनावर आरोप करताना म्हटले की, काश्मीरची राणी आणि लोहरच्या (पुंछ) राणी दिद्दा यांच्या कथेचा कॉपीराईट त्यांच्याकडे आहे. असे असूनही कंगनाने यामध्ये हस्तक्षेप केला आहे. ते म्हणाले, ‘एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या पुस्तकावर आणि त्यातील कथेवर आपला अधिकार निश्चित केला आहे, ही बाब कल्पनाशक्तीच्या पलीकडली आहे.’(Mumbai Police files new FIR against actress kangana ranaut)

कंगनावर गुन्हा दाखल

वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 405  (अपराधिक विश्वासघात), 415, 120 बी (गुन्हेगारी कट रचणे) आणि कॉपीराईट उल्लंघन केल्यामुळे एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या केला जात आहे.

शेतकर्‍यांविषयीचे आक्षेपार्ह ट्विट प्रचंड चर्चेत

अभिनेत्री कंगना रनौत बहुतेकदा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे वादात अडकते. शेतकऱ्यांबद्दलच्या आक्षेपार्ह ट्विटमुळे कंगना आधीच अनेक वादात अडकली आहे. दिल्ली गुरुद्वारा शीख समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे कंगनावर खटला चालवण्यात येत आहे. या खटल्याची सुनावणी सुरू असताना पटियाला हाऊस कोर्टाने दिल्ली पोलिसांना याप्रकरणी अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट (एटीआर) दाखल करण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत. त्याची पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत कंगनावर दाखल झालेल्या नवीन एफआयआरमुळे तिच्या अडचणी वाढ होऊ शकते.

(Mumbai Police files new FIR against actress kangana ranaut)

हेही वाचा :

Kangana Ranaut | कंगना रनौत कोर्टाच्या आदेशाच आज तरी पालन करणार का?

Kangana Ranaut | मी वाद सुरु करत नाही, संपवते : कंगना रनौत

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.